MLA GANESH GAONKAR Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात सावंत सरकारमधील आमदार अडचणीत; गावकर यांच्याविरोधात पोलिस तक्रार

MLA Ganesh Gaonkar: एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या ऑडिओ टेपवरून ही तक्रार देण्यात आलीय.

गोमंतक ऑनलाईन टीम

Cash For Job Scam

फोंडा: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असतानाच, आता आमदार गणेश गावकर यांच्‍या विरोधात कुळे पोलिस स्‍थानकात तक्रार देण्‍यात आली आहे.

व्‍हायरल झालेल्‍या ऑडिओ क्‍लीपचा त्‍यासाठी आधार घेण्‍यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्याविरुद्ध आज बुधवारी सकाळी कुळे पोलिसांत तक्रार दिली आहे.

ताम्हणकर यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या ऑडिओ टेपवरून ही तक्रार देण्यात आलीय. आमदार गावकर सावर्डे मतदारसंघातील एका कार्यकर्त्याकडून सहा लाख रुपये मागत असल्याचे म्हटले आहे.

सरकारी नोकरीसाठी आपण मोन्सेरात नामक इसमाला कार्यकर्त्याच्या नोकरीसाठी सात लाख रुपये दिले होते. पैकी एक लाख रुपये या कार्यकर्त्याने गणेश गावकर यांच्याकडे दिले होते. उर्वरित सहा लाख रुपये आमदार गावकर मागत असल्याचे ऑडओ टेपवरून स्पष्ट होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हे पैसे शाम नामक व्यक्तीकडे देणे, असेही त्यात म्हटले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहिल्यास राजकीय क्षेत्रातील मूळ सूत्रधारांची नावे बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.

निष्पक्षपाती चौकशी व्हावी!

आमदार गणेश गावकर यांचा ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्‍यक्‍त करत, या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे. तक्रारीची प्रत इतर सर्व संबंधितांबरोबरच मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT