पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून नोकरी घोटाळा प्रकरण सुरु आहे. या घोटाळा प्रकरणात गोव्यात गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल ४१ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, ज्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळण्यात आलेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिवाळी अधिवेशन २०२५ मध्ये दिलेल्या या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, पण सध्या या प्रकरणांचा तपास अजून चालू असल्याने अधिक माहिती देणे बरोबर नाही.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२३ मध्ये नोकरी घोटाळा संदर्भात एकूण सात प्रकरणे नोंदवली गेली, ज्यापैकी चार गुन्ह्यांची आरोपपत्र दाखल झाली आहेत. मात्र गेल्यावर्षात म्हणजेच २०२४ मध्ये एक धक्कादायक वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी गोव्यात नोकरी घोटाळ्यात ३४ प्रकरणे नोंद करण्यात आली पण केवळ यांपैकी फक्त दोनच प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.
या घोटाळ्यातील एक प्रमुख प्रकरण म्हणजे जल संसाधन विभागातील कनिष्ठ अभियंता संदीप जगन्नाथ परब याच्यावर दिपाश्री सावंत आणि दिपाश्री गावस यांच्याशी संगतमात करून ४६ जणांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. विशाल अर्जुन गावकर नावाच्या इसमाने म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर परबला अटक करण्यात आली.
या प्रकरणी दिपाश्री सावंत आणि दिपाश्री गावस यांनाही अटक झाली आहे. मात्र, तपास सुरू असल्याने साक्षीदारांची किंवा आरोपींची माहिती उघड करण्यात आलेली नाही. सर्व तक्रारींमधील व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून दोषी आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
राज्यात सुरु असलेल्या सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणावर बोलताना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला पुन्हा एकदा पिंजऱ्यात उभं केलं आहे. सरदेसाई त्यांच्या म्हणण्यानुसार नोकरी घोटाळा प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी म्हणूनच हिवाळी अधिवेशन एका दिवसावर आणण्यात आलं.
अधिवेशनाच्या दोन दिवसनपूर्वी गोव्याच्या जनतेला फसवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या, मात्र खरा आरोपी अजूनही पोलीस कोठडीत पोहोचलेलाच नाही. या घोटाळा प्रकरणात सरकारचा हात आहे आणि म्हणूनच आरोपींना संरक्षण दिलं जातंय. गोव्यात सुरु असलेला हा घोटाळा मध्य प्रदेशातील घोटल्यासारखाच आहे असं सरदेसाई म्हणालेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.