Cash For Job Goa Scam Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: पूजाने सांगितलेल्या 'त्या' मंत्र्याचे नाव घेण्‍यास सरकार, पोलिसांचा नकार! 'FIR'वरून मुख्‍यमंत्री–पोलिसांकडून परस्‍परविरोधी वक्तव्‍ये

Cash For Job Goa: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने क्राईम ब्रॅंचकडे ज्‍या मंत्र्याचे नाव उघड केले आहे, त्‍या मंत्र्याचे नाव घेण्‍यास सरकार आणि पोलिसांनी बुधवारी स्‍पष्‍टपणे नकार दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने क्राईम ब्रॅंचकडे ज्‍या मंत्र्याचे नाव उघड केले आहे, त्‍या मंत्र्याचे नाव घेण्‍यास सरकार आणि पोलिसांनी बुधवारी स्‍पष्‍टपणे नकार दिला. पुरावे हाती आल्‍यानंतरच या प्रकरणाची सविस्‍तर माहिती देणे शक्‍य होईल, असा दावाही त्‍यांनी केला.

‘पूजा नाईकने केलेल्‍या आरोपांनुसार क्राईम ब्रांचने प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पोलीस नव्याने तपास करीत आहेत. या प्रकरणात पूजाने यापूर्वी कुणाकुणाकडून पैसे घेतले हे उघड केलेले नव्हते.

ती माहिती नव्यानेच पुढे आल्याने या प्रकरणी ‘एफआयआर’ नोंद करून पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली आहे’’, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

‘‘यासंदर्भात ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे त्या सर्वांची पोलिस चौकशी करतील. प्रकरणातील पुरावे हाती आल्यानंतरच पुढील कारवाई होईल. त्‍यानंतरच या विषयावर बोलणे उचित ठरेल.

सध्या पोलिसांकडून तपासकाम सुरू असल्याने गृहमंत्री या नात्‍याने मी आणि पोलीस या विषयावर बोलत नाही. तपासकाम पूर्ण झाल्‍यानंतर आणि पुरावे हाती आल्‍यानंतरच या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देता येईल’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

दरम्‍यान, ‘जॉब स्‍कॅम’ प्रकरणात आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला १७.६८ कोटी रुपये दिल्‍याचा आणि संबंधित मंत्री विद्यमान मंत्रिमंडळात असल्‍याचा गौप्‍यस्‍फोट पूजा नाईक हिने केल्‍यानंतर राज्‍याच्‍या राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाने (आप) यावरून सरकारवर हल्लाबोल सुरू ठेवला असून त्‍या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्‍याची मागणी लावून धरली आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना पत्रकारांनी बुधवारी पूजा नाईक विषयावरून पुन्‍हा छेडले असता, ‘‘या प्रकरणाचा सध्‍या क्राईम ब्रांचकडून तपास सुरू आहे. ज्‍या खासगी वृत्तवाहिनीच्‍या वार्ताहराने पूजा नाईकची मुलाखत घेतली, त्‍याच्‍या भावाला सार्वजनिक बांधकाम खात्‍यात पैसे देऊन नोकरी मिळाली? की मेरिटवर? हे त्‍याने तपासावे’’, असे ते म्‍हणाले.

‘‘पूजा नाईकबाबत प्रसिद्ध आणि प्रकाशित होत असलेली वृत्ते बघून तिने ज्‍या वृत्तवाहिनीला सतत मुलाखती दिल्‍या ‘ती विशिष्‍ट वृत्तवाहिनी’ आणि वर्तमानपत्रे विकत घेतली आहेत की काय? असेही ढवळीकर म्हणाले.

यासंदर्भात क्राईम ब्रॅंचचे अधीक्षक राहुल गुप्‍ता यांच्‍याशी संपर्क साधला असता, ‘‘क्राईम ब्रॅंचच्‍या चौकशीत पूजा नाईक हिने या प्रकरणात सहभागी मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याचेही नाव घेतले. परंतु, आपण पैसे आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला दिल्‍याचे तिने म्‍हटले आहे.

मंत्र्याला पैसे दिल्‍याचा उल्लेख तिने केलेला नाही. त्‍यामुळे संबंधित आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याविरोधात एफआयआर दाखल करण्‍याची प्रक्रिया क्राईम ब्रॅंचने सुरू केली आहे. मंत्र्याविरोधात मात्र तूर्तास एफआयआर दाखल केली जाणार नाही’’, असे ते म्‍हणाले.

‘आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याविरोधात एफआयआर दाखल करण्‍यास सरकारची परवानगी घेणे आवश्‍‍यक असते. त्‍यामुळे याबाबतची फाईल सरकारला सादर करण्‍यात येईल. मंजुरीनंतर तत्‍काळ त्‍या दोघांविरोधातही एफआयआर दाखल करून, त्‍यांच्‍या चौकशीस सुरुवात होईल’, असेही गुप्‍ता म्हणाले.

पीडब्‍ल्‍यूडीतील नोकरभरतीतील गोंधळाबाबत केलेल्‍या वक्तव्‍यावर मी ठाम राहिलो. त्‍यामुळे सरकारने त्‍यावेळी ही नोकरभरती रद्द केली होती. परंतु, पूजा नाईकचा विषय मला विचारू नका. ती ज्‍यांच्‍यावर आरोप करीत आहे, त्‍यांनाच विचारा. - बाबूश मोन्‍सेरात, महसूलमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Khau Katta: वाळपईतील 'खाऊ कट्टा' कधी सुरू होणार? नागरिकांचा प्रश्‍न, नवीन संकुलाच्या उद्‍घाटनाची प्रतीक्षा

Rohit Sharma: रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळणार? 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'ने दिली मोठी अपडेट

Goa Live News: मडगावात गांधी मार्केटमध्ये आग; बंद गोदामातून धुराचे लोट

Goa ZP Election: तोरसेत भाजपमध्ये गटबाजी, विरोधकांनी आखली रणनीती; सर्वपक्षीय उमेदवार ठरविण्‍यासाठी रविवारी खास बैठक

Gasification Project Sonsodo: सोनसड्यावर उभारणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प, 10 टन क्षमता; मडगाव पालिकेने केली त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT