Goa Carnival and Shigmotsav Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival and Shigmotsav : कार्निव्हल आणि शिगमोत्सवासाठी गोवेकर उत्सुक; मात्र यंदा असणार हे नियम

गोव्यात अकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले कार्निव्हल आणि शिगमोत्सव आता लवकरच सुरू होणार आहे.

Kavya Powar

Goa Carnival and Shigmotsav : गोव्यात अकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले कार्निव्हल आणि शिगमोत्सव आता लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आज पर्यटन विभाग, गोवा पोलीस, अग्निशमन दल यांची बैठक पार पडली.

यावरून यंदाच्या कार्निव्हल आणि शिगमोत्सवासाठीच्या आवश्यक सूचना पत्रकार परिषदेत पर्यटन विभागाचे संचालक निखिल देसाई यांनी दिल्या.

यंदाच्या कार्निव्हलसाठीच्या महत्वाच्या गोष्टी :

2023 चे कार्निव्हल 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 4 मुख्य ठिकाणे असून इतर 2 ठिकाणेही असणार आहेत. यंदा उत्कृष्ट कार्निव्हल फ्लोट आणून उत्सवाची शोभा वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. याबाबत आम्ही प्रत्येक आयोजकांना तशा सूचना केल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.

कार्निव्हल परेडसाठी आयोजकांना मार्ग ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील असणार आहे. प्रामुख्याने पारंपरिक मार्गांचीच निवड करण्यात येणार असून याबाबत आयोजकांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

कार्निव्हल परेड याठिकाणी यादिवशी होणार :

Goa Carnival 2023

शिगमोत्सवासाठीच्या आवश्यक सूचना :

शिगमोत्सवास हा गोव्याची संस्कृती दर्शवणारा एक महत्वाचा उत्सव आहे. यंदा शिगमोत्सव 8 मार्चपासून सुरू होणार आहे. यामध्ये परेडसाठी फोंडा, वास्को, म्हापसा आणि पणजी ही मुख्य शहरे असणार आहेत. त्याचबरोबर इतर 17 ठिकाणेही शिगमोत्सवासाठी असणार आहेत.

कार्निव्हलप्रमाणेच शिगमोत्सवासाठीही आयोजकांना मार्ग निवडण्याची आणि त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलिसांची परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

10 नंतर संगीत शिगमो परेडवर बंदी

यावर्षी शिगमो परेडसाठी काही सक्तीचे नियम लावण्यात आले आहेत. उच्च न्यायालयातर्फे रात्री 10 नंतर संगीत वाजवण्यावर बंदी असल्याने शिगमो परेडसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे.

यासाठी सर्व फ्लोट्स, कलाकार आणि संघांना वेळेतच येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 नंतरही जर संगीत सुरू असले तर ते ताबडतोब बंद करण्यात येईल असा इशारा देसाई यांनी दिला.

यानंतर कमिटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिगमो परेड 4 वाजता सुरू होणार असून परेडमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघांनी वेळेतच हजर राहणे अनिवार्य असणार आहे. उशिरा येणाऱ्या संघांना परवानगी देण्यात येणार नसून जे कुणीही पोलिसांचे ऐकणार नाहीत त्यांना परेडमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींची काळजी आयोजकांनी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: डिलिव्हरी एजन्सी वापरत असलेल्या वाहनांवर इतर राज्यांच्या नोंदणी प्लेट

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT