Carnival Festival Goa 2024  Dainik Gomantak
गोवा

Vasco Carnival 2024: वास्को शहरात कार्निव्हलची धूम

Vasco Carnival 2024: 60 चित्ररथांचा सहभाग: मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

दैनिक गोमन्तक

Vasco Carnival 2024: ‘खा, प्या आणि मजा करा’, या किंग मोमोच्या संदेशाने वास्को शहरात आज सोमवारी मोठ्या दिमाखात व्हिवा कार्निव्हल फ्लोट परेड झाली. रंगीबेरंगी आणि आकर्षित असे 60 चित्ररथांची मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

या वर्षीच्या कार्निव्हल संकल्पनेमध्ये ‘पर्यटन परंपरा आणि वारशाचा सन्मान’ यावर भर देण्यात आला. मिरवणूक सेंट ॲर्ण्डू चर्च मार्गाने सुरू होऊन स्वतंत्र पथ मार्गाने मार्गक्रमण झाल्यानंतर रेल्वे स्थानकासमोर जोशी चौकात सांगता झाली. उत्सवात सहभागी होण्यासाठी स्थानिक लोक आणि पर्यटकांची गर्दी खेचली.

वास्कोत कार्निव्हल मिरवणूक सेंट ॲण्ड्रू चर्च ते स्वतंत्र पथ या मार्गावरून काढण्यात आली. किंग मोमोकडून ''खा प्या मजा करा'', असा संदेश देण्यात आला. या चित्ररथ मिरवणुकीत सुरुवातीला नौदलाचा चित्ररथ सहभागी झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोकांनी गर्दी केली होती व कार्निव्हलचा आनंद लुटला.

त्यामुळे कार्निव्हलची धूम दिसून आली. पारंपरिक मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीच्या मार्गावर मुखवटे व पताका लावून सजावट करण्यात आलेली होती. यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई ,

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीष बोरकर,कार्निव्हल समिती अध्यक्ष फ्रान्सिस्को यासह फियोला रेगो, आर्नोल्ड रेगो व इतर वास्को कार्निव्हल उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.

गोव्याच्या श्रीमंतांचे प्रदर्शन, सांस्कृतिक वारसा जपताना उत्साही फ्लोट्स, संगीत आणि नृत्य सादरीकरणाने वास्को शहर चैतन्यमय झाले. विशेषत: तरुणांनी उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला.

आकर्षक चित्ररथांचा सहभाग

कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकीत गोवा पर्यटन विभागाचा चित्ररथ, नौदलाचा चित्ररथ, गोवा पोलिस, आरोग्य विभागाच्या चित्ररथाने सहभाग दर्शवला. रेबिजमुक्त गोवा, जीसुडाचा कचरा व्यवस्थापन दर्शवणारा, पंचायत संचालनालयाचा बायोगॅसची माहिती देणारा, ड्रंक अँड ड्राईव्ह, पर्यावरणाचे रक्षण व इतर संदेश देणारे चित्ररथ मिरवणुकीत होते.

कार्निव्हल हा गोव्याचा उत्सव आहे. गोव्यातील लोक कार्निव्हल मध्ये सहभागी होत आनंद लुटतात. हा कार्निव्हल शांततेत व विविध कार्यक्रमांनी साजरा व्हावा. राज्यातील युवक हे जबाबदारीने वागणारे आहेत. त्यांनी पुढे ही परंपरा कायम ठेवली पाहिजे.
-सुभाष फळदेसाई, समाज कल्याण मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT