Goa Carnival 2024 Dainik Gomantak
गोवा

Vasco News : वास्कोत आजपासून कार्निव्हलची धूम; सोमवारी शोभायात्रा

Vasco News : ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेश नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, कार्निव्हलची धूम वास्कोत उद्या (ता.१०) पासून सुरू होत असून १३ रोजीपर्यंत विविध कार्यक्रम होतील. १२ रोजी शहरात कार्निव्हल शोभायात्रा होणार आहे.

कार्निव्हलसाठी वास्को सज्ज झाले आहे. यंदा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि वेगवान वाहने तसेच पथकांना शोभायात्रेत सहभागी करून घेण्यात येणार नाही, अशी माहिती वास्को कार्निव्हल समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को डिसोझा यांनी दिली.

आजपासून विविध कार्यक्रम

१० रोजी सायंकाळी ५ वा. पालिकेच्या मुख्य रंगमंचावर उद्‍घाटन समारंभ होईल. त्यानंतर मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आशिष आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण, शाळा आणि महाविद्यालयांसाठी नृत्य स्पर्धा व आयएनएस वेर्णातर्फे "जागोर" सादर केला जाईल.

११ रोजी बायणा बीचवर सकाळी टाय ब्रेकर, संध्याकाळी पालिकेसमोर मुख्य रंगमंचावर बँड क्ले जारचा कार्यक्रम, स्वप्नील डान्स अकॅडमीतर्फे नृत्य सादरीकरण व त्यानंतर पियो अग्नेलो यांचा "लाँग लिव्ह कार्निव्हल लाँग लिव्ह गोवा" कोकणी म्युझिकल शो होईल.

१२ रोजी दुपारी ३.३० वाजता शोभायात्रेस सुरवात, मुख्य स्टेजवर (किंग्ज) नृत्य सादरीकरण, ऑरविले आणि सिल्विया यांचे डुओ बँड सादरीकरण, रशियन बेली डान्सर मार्गारिडा यांचे सादरीकरण व "बँड फ्रंट लाइन"चा कार्यक्रम होईल.

१३ रोजी सायंकाळी ५.३० वा. पारितोषिक वितरण सोहळा, त्यानंतर ज्युनिअर रेगन यांचा कोकणी म्युझिकल शो, बँडसह सोनिया शिरसाट यांच्या गायनाचा कार्यक्रम व त्यानंतर"ॲम्बेसेडर बँड"चे सादरीकरण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT