Goa : valpoi - Caranzol residents raising their hands in support of Bhumiputra movement at Caranzol. Dainik Gomantk
गोवा

Goa : करंझोळवासीयांचा भूमिपुत्र आंदोलनाला पाठिंबा

Goa : भूमिपुत्र अधिकारणी विधेयक रद्द करण्याची बैठकीत मागणी

Mahesh Tandel

वाळपई : करंझोळ - सत्तरी (Caranzol Sattari) येथे भूमिपुत्रांची बैठक झाली. यावेळी करंझोळ गावच्या भूमिपुत्रांनी भूमिपुत्र आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने विधानसभेत संमत केलेले गोवा भूमिपुत्र अधिकारीणी विधेयक रद्द करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. सत्तरीत पूर्ण जमीन मालकीचा प्रश्न (Land owner issue) अधांतरी आहे. पूर्ण जमीन मालकी मिळण्यासाठी सरकारने खरे तर विधेयक आणण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्‍याबद्दल बैठकीत नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

करंझोळचे बातू गावडे म्हणाले सरकारने संमत केलेले भूमिपुत्र विधेयक मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे. त्याला आमचा प्रखर विरोध आहे. असे विधेयक मूळ गोमंतकीयांसाठी घातक आहे. त्‍यामुळे परप्रांतीयांना भूमिपुत्र दर्जा मिळणार आहे. म्हणूनच अशा प्रकारचे विधेयक सरकारने यापुढे संमत करू नये.

यावेळी अर्जुन गावडे, हरिश्चंद्र गावस, प्रांजल साखरदांडे, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, गणपत झर्मेकर, श्रीधर नाईक, सुदेश तिवरेकर, सूरज नाईक, सलमान खान, किशोर राव, राजेश सावंत, विश्वेश प्रभू, सोमनाथ गावडे, संतोष गावडे यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवरांची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी हात उंचावून भूमिपुत्र आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. बातू गावडे म्हणाले, सत्तरी तालुक्यातील नागरिक गोवा मुक्तीपूर्वीपासून वास्तव्य करून आहेत. त्यांना अजून पूर्ण जमीन मालकी मिळत नाही. पण, सरकार भूमिपुत्र विधेयक आणून केवळ तीस वर्ष वास्तव्य करून असलेल्या लोकांना घर मालकी देण्यास तयार झाली आहे. त्यातून परराज्यातील लोकांचे मात्र फावणार आहे. मूळ गोमंतकीय मात्र या मातीतील भूमिपुत्र असूनही त्यांना पूर्ण मालकी मिळत नाही हे दुर्दैव आहे. सत्तरीतील जंगलात येथील भूमिपुत्र वास्तव करून असून त्यांना मात्र वनखात्याचा त्रास होतो आहे. वनभागातील लोकांना घरमालकी मिळत नाही. यावेळी विश्वेश प्रभू, प्रजल साखरदांडे, आदींनी विचार मांडून विधेयकाला प्रखर विरोध दर्शविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT