Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: नियंत्रण सुटल्‍याने कारचा अपघात, चालक जखमी

कार रस्‍ता सोडून दहा फूट खोल सखल भागात कोसळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident राज्‍यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. गत रविवारीही चार अपघाताच्‍या घटना घडल्‍या होत्‍या. आज फर्मागुडी येथे सकाळी एक कार रस्‍ता सोडून दहा फूट खोल सखल भागात कोसळली. या अपघातात चालक जखमी झाला.

तातडीने त्‍याला उपचारांसाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. कार माशेलला जात होती. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले.

हल्‍ली झालेल्‍या बहुतांश अपघातांत चालकाला डुलकी येणे, तंद्री लागणे असे प्रकार अधिक होते. दरम्‍यान, फर्मागुडी अपघातात कारमध्‍ये चालक एकटाच असल्‍याचे समजते. पोलिस अधिक तपास करत आहेत.

शनिवारी 11 वाजण्याच्या सुमारास दोनापावला मणिपाल रुग्णालयाच्या समोरील मार्गावर अपघाताची घटना घडली होती. दोन कारमध्ये अपघात झाला होता. या अपघातातील किरकोळ जखमी महिलेला मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

तसेच गुरुवारी सकाळी मणिपाल रुग्णालयासमोरील जंक्शनवर दोन कारमध्ये अपघात झाला. बलेनो कार जंक्शनवरुन वळण घेताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT