Car Accident on Cortalim-Sancoale Highway Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Car Accident: कुठ्ठाळी-सांकवाळ महामार्गावर भरधाव फॉर्च्युनर कारने 3 वाहनांना ठोकरले; 3 जखमी

ओव्हरटेक करताना अपघात; वाहनांचे नुकसान

दैनिक गोमन्तक डिजिटल

Car Accident on Cortalim-Sancoale Highway Goa: कुठ्ठाळी सांकवाळ महामार्गावर गुरूवारी 8 जून रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास विचित्र अपघात झाला. एका भरधाव फॉर्च्युनर कारने येथे 3 वाहनांना ठोकरले. सुदैवाने या अपघातात कुणाचा मृत्यू झालेला नसला तरी तीन जण जखमी झाले आहेत.

यात पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, फॉर्च्युनर कारसह ठोकरलेल्या चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. दाबोळी विमानतळाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर कारने सांकवाळ येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात चार वाहनांना ठोकरले.

दरम्यान, अपघातातील फॉर्च्युनर ही रेंट अ कार मधील वाहन आहे. भाड्याने ती कार संबंधित वाहनचालकाने घेतली होती. इतर वाहनांना वेगाने ओव्हरटेक करत चालक दाबोळी विमानतळाकडे जात होता. यावेळी वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने येत असलेल्या

वॅगन आर (जीए 06 टी 5062) कारला फॉर्च्युनरची धडक बसली. त्यामुळे वॅगन आर कार पलटली. या कारमधील तिघेजण जखमी झाले आहेत. फॉर्च्युनर कारने पुढे जाऊन आणखी दोन वाहनांना धडक दिली.

वॅगन आर कारमध्ये पर्यटक होते. ते दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळाकडे चालले होते. या अपघातात दोन पर्यटक व कारचालक गंभीर जय्वमी झाले. त्यांना 108 रूग्णवाहिकेतून बांबोळीतील गोमॅकोमध्ये दाखल केले गेले.

तसेच त्या मार्गावर विरुद्ध दिशेने असलेल्या रिलायन्स मोबाईल टॉवरला जाऊन फॉर्च्युनर कार धडकली. यात टॉवरचेही नुकसान झाले आहे. इतर वाहनधारकांनी फॉर्च्युनरच्या ड्रायव्हरला अडवून वेर्णा पोलिसांच्या ताब्यात दिले.

वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT