Canacona Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa: काणकोण पालिका भवनाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

Canacona: दुर्घटनेची भीतीने पालिका भवन पुन्हा बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Canacona: काणकोण पालिका भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे ते पाडून पुन्हा बांधण्याची मागणी काल ‘व्हीजन ॲण्ड मिशन’ या बॅनरखाली घेतेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी नगरसेवक धीरज नाईक गावकर, श्‍यामसुंदर देसाई, जनार्दन भंडारी उपस्थित होते.

11 कोटी रुपये खर्चून सुडातर्फे पालिका भवन उभारण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सुडाचा जबाबदार कर्मचारी बांधकाम स्थळी उपलब्ध असत नाही. त्यामुळे कंत्राटदार मनमानी करत आहे.

खडीची भुकटी बांधकामात वापरण्यात येत आहे. बांधकामाचा पाया मजबूत नाही. कॉलम कलंडलेले आहेत. हल्लीच सभापती रमेश तवडकर यांच्यासह नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर व नगरसेवकांनी बांधकामाची पाहणी केली होती. त्यावेळी सभापतींनीही बांधकामाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी सांगितले.

दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. दोन हप्त्यात कंत्राटदाराला बिले दिली आहेत. आता फक्त अंतिम बिलाची फेड पालिकेने करायची आहे असे नगराध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT