Goa News |Canacona  Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोकर्ण-पर्तगाळी मठातर्फे राम मंदिरासाठी एक कोटी

Goa News: श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी ८ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची देणगी देण्‍यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: गोकर्ण-पर्तगाळी जीवोत्तम मठातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी ८ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची देणगी देण्‍यात आली आहे. रामराज्य रथयात्रा पर्तगाळी मठात पोचल्यानंतर श्रीमद्‌ विद्याधीश स्वामी यांनी स्वागत करताना ही घोषणा केली.

माझे गुरुस्वामी श्रीमद्‌ विद्याधीराज तीर्थ स्वामी वयाच्या ७७व्या वर्षी वृंदावनस्थ झाले. त्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा निधी श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी देण्यात येत असल्याची घोषणा स्वामींनी केली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व मठ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

रथयात्रा कर्नाटककडे

पर्तगाळी मठात काल रात्री मुक्काम केल्‍यानंतर आज रथयात्रेने पोळेमार्गे कर्नाटकात प्रवेश केला. तत्‍पूर्वी, पैंगीण येथील परशुराम देवालय प्राकारात श्री परशुराम पंचग्राम देवालय समितीने रथयात्रेचे भव्य स्वागत केले. देवालयाचे अर्चक निशिकांत टेंगसे यांनी आरती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT