Goa Food | School Student Dainik Gomantak
गोवा

Midday Meal Scheme: काणकोणात दरवाढीमुळे 'माध्यान्ह' आहार बंद!

Goa Food: या योजनेचा फायदा घेणारे सुमारे दोन हजार शाळकरी मुले माध्यान्ह आहारापासून वंचित आहेत.

दैनिक गोमन्तक

Canacona: महागाई वाढल्यामुळे माध्यान्ह आहाराचे दर परवडत नाहीत. त्यामुळे स्वंय साहाय्य गटांनी 1 ऑक्टोबरपासून शाळकरी मुलांचा मध्यान्ह आहार पुरविणे बंद केले आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेणारे सुमारे दोन हजार शाळकरी मुले (School Boy) मध्यान्ह आहारापासून वंचित आहेत.

2014 मध्ये राज्यातील मध्यान्ह आहार पुरविणाऱ्या स्वयं साहाय्य गटाच्या मागणी प्रमाणे दरात 2009 पेक्षा किंचित वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पहिली ते चौथीच्या मुलांसाठी मध्यान्ह आहाराचे दर 6.11 रुपये व पाचवी ते आठवीसाठी 7.45 रुपये असा देण्यात येत होता. त्यावेळी मुलांना खिचडी, पुलाव, भाजी पाव हा मेनू होता. मात्र आता त्या मेनूत बदल करण्यात आला आहे.

सध्या कडधान्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रचलित दरात मध्यान्ह आहार पुरविणे शक्य नाही. त्यासंबंधी शिक्षण खात्याला आगाऊ कळविण्यात आले आहे. विद्यार्थी किमान दहा रूपये व सहावी ते आठवी प्रति मुलांसाठी किमान दहा रुपये दर निश्चित करणे गरजेचे आहे. असे ओमकार स्वंय साहाय्य गटाच्या अध्यक्ष संध्या ऊर्फ स्नेहा देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT