Calangute Police  Dainik Gomantak
गोवा

Calangute Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नायजेरीयन नागरिकाला अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई

पेकळंगुट पोलिसांनी 70 हजारांचे अमली पदार्थ जप्त केले

Rajat Sawant

Calangute Drug Case : गोव्यात वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. परबोवाडा येथे कळंगुट पोलिसांनी अंमली पदार्थांवर छापा टाकल्याचे वृत्त समोर आले असून यात नायजेरीयन नागरिकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परबोवाडा कळंगुट येथील पालमारिन्हा रिसॉर्टजवळ एका ग्राहकाला अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक संशयित दुचाकी घेवून येणार असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित त्या रिसॉर्टजवळ आला असता पोलिसांनी छापा टाकत संशयिताची व त्याच्या दुचाकीची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे 04 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ व 2 ग्रॅम सायकोट्रॉपिक पदार्थ एक्टसी आढळून आला.

या कारवाईत कळंगुट पोलिसांनी संशयित अकोमोलाफे ओलायंका ओलुसोला, वय 23 वर्षे या नायजेरियन नागरिकाला अटक केली. तसेच त्याच्याकडील 70 हजारांचे अंमली पदार्थ व दुचाकी जप्त केली.

त्याच्यावर एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

October Heat: 34 अंश तापमान, पण अंगाला जाणवतोय 43 अंशांचा चटका! गोव्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याची तीव्रता वाढली

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

SCROLL FOR NEXT