Goa Cabinet Restructure Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Cabinet: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच; छोट्या राज्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cabinet Reorganization

पणजी: गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच होऊ शकते. पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीतच गर्क आहेत. त्यामुळे गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या राजकीय विषयावर अवधी देण्यास त्यांच्याकडे वेळ नाही.

‘‘गोवा मंत्रिमंडळातील फेरबदल हा राज्यासाठी जरी छोटा विषय वाटत असला तरी पक्षश्रेष्ठींना त्याही विषयावर साधकबाधक चर्चा करावयाची आहे. कदाचित त्यांच्या मनात काही मोठे फेरबदल करायचे असू शकतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरच ते काय आहे ते होऊ शकते’’, अशी माहिती पक्षाच्या एका उच्चपदस्थाने आज ‘गोमन्तक’ला दिली.

मंत्रिमंडळात फेरबदल गणेश चतुर्थीनंतर होतील असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच केले होते. त्यांनी दिलेल्या काही मुलाखतींमधून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची वेळ आली आहे हे स्पष्ट झाले होते.

पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते बोलले होते. मंत्रिमंडळाच्या फेरबदलावरून विद्यमान मंत्र्यांमध्ये चलबिचल आहे व काही ताकदवान मंत्र्यांमध्ये तर अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस काही मंत्र्यांनी दिल्लीत लॉबिंगही चालविले आहे.

‘‘महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरच आता गोव्यात बदल होतील हे पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेटायला गेलेल्या गोव्यातील मंत्र्यांकडे स्पष्‍ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील धाकधूक पुढच्या एका महिन्यासाठी तरी संपली आहे,’’ असेही या सूत्रांनी सांगून कोण पक्षश्रेष्ठी व त्यांना कोण-कोण भेटले आहेत, हे सांगण्यास मात्र नकार दिला.

दिगंबरनी वाढविली मुख्‍यमंत्र्यांची डोकेदुखी

दिगंबर कामत व संकल्प आमोणकर यांना मंत्रिमंडळात प्रवेश करण्याची आस लागून राहिली आहे. परंतु माजी मुख्यमंत्री कामत यांना मंत्रिमंडळात स्‍थान दिले तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची खाती द्यावी लागतील व त्यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वतःकडची काही खाती सोडावी लागतील किंवा अन्य ताकदवान मंत्र्यांकडील खाती काढून घ्यावी लागतील. काही मंत्र्यांच्या उचापतींवर मुख्यमंत्री नाराज आहेत. काही मंत्र्यांमध्‍ये वाक्‌युद्धही सुरू आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाची त्यास किनार आहे.

तूर्त तरी गोव्‍याकडे दुर्लक्षच

येत्‍या नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणुका होतील असे संकेत आहेत. त्या राज्याचा निकाल लागल्यानंतरच गोव्याकडे लक्ष देण्यास पक्षश्रेष्‍ठींना फुरसत मिळेल.

निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना-ठाकरे गटाने चालविलेल्या शह-काटशहाच्या घडामोडींनी राजकीय अवकाश व्यापला आहे.

दर दिवशी थकित करणाऱ्या नित्य नव्या घटनांमुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्‍ट्राकडे लागले आहे. त्यात भाजप नेतृत्वाला मागे राहून चालणार नाही, हे समजून आल्याने पक्षश्रेष्ठींनी गोव्यासारख्या छोट्या राज्याकडे तूर्त तरी काणाडोळा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT