Goa Cabinet Reshuffle Dainik Gomantak
गोवा

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती तवडकरांना मिळणार मंत्रीपद, सिक्वेरा देणार राजीनामा; गणेश गांवकराकडे सभापती पदाची धूरा

Goa Cabinet Reshuffle: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

Pramod Yadav

पणजी: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला गोवा मंत्रीमंडळाच्या फेरबदलाला अखेर मूर्हूर्त लागला असून, दोन नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

तर, विद्यमान मंत्री आलेक्स सिक्वेरा वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनीच केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर गुरुवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.

गेल्या एक वर्षापासून गोवा मंत्रिमंडळातील फेरबदल रखडला आहे. वर्षभरात मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले होते. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर फेरबदलाबाबत नेत्यांकडून संकेत देण्यात आले होते. आता या फेरबदलाच्या हालचालींना वेग आला असून, नव्याने दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

विद्यमान पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तर, यापूर्वी तत्कालिन क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी नीलेश काब्राल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे खाते मुख्यमंत्री सावंत यांनी स्वत:कडे ठेवली होती. तर, रमेश तवडकरांना कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, तवडकरांना प्रमुख खाते मिळण्याची शक्यता आहे. तसेच, गोविंद गावडे यांच्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा आणि कला आणि संस्कृती खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार का? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गणेश गांवकरांकडे सभापतीपदाची जबाबदारी

रमेश तवडकरांना मंत्रिपदी बढती मिळाल्यानंतर रिक्त होणाऱ्या सभापतीपदी सावर्डेचे आमदार गणेश गांवकरांची वर्णी लागणार आहे. रमेश तवडकरांना मंत्रीपद दिल्यानंतर सभापतीपदाच्या जागी आणखी एका एसटी नेत्याला संधी देत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झाला नसला तरी या निवडी अंतिम असल्याची खात्रीशीर माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जीएसटी काउंसिलच्या बैठकीसाठी आज (२० ऑगस्ट) दिल्लीत आहेत. या निमित्ताने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ फेरविस्तारावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला असून, राज्यातील आमदार विविध विषयांसाठी भेट घेत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT