Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Cabinet Decision: ...तर घरमालकाला १० हजारांचा दंड; मंत्रिमंंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Goa Cabinet Meeting Updates : आज झालेल्या मंत्रिमंंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: आज बुधवार (दि. १६ ऑक्टोबर) रोजी झालेल्या मंत्रिमंंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महत्वाचे निर्णय जाहीर केले. पैकी राज्यात काही दिवसांपूर्वी सुरु असलेल्या भाडेकरू पडताळणी मोहिमेवर त्यांनी भाष्य केले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नवीन घोषणेनुसार आता पोलिस प्रत्येक भाडेकरूपर्यंत पोहोचतील आणि जर यामध्ये कुणा भाडेकरूची पडताळणी न झाल्याची माहिती मिळाली तर घरमालकाला १ ते १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. एवढंच नाही तर कोणताही भाडेकरू गुन्हेगारी कृत्य करताना आढळल्यास घरमालकावर कारवाई केली जाईल.

बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय:

  • राज्यात सरकार बलरथ योजना सुरू ठेवणार आहे पण योजनेअंतर्गत नवीन बसेस देणार नाही. शाळेच्या व्यवस्थापनाने योजनेचा पैसा वापरत हा उपक्रम सुरु ठेवावा अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

  • कळंगुट येथे गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या आणखीन घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, हे गुन्हे रोखण्यासाठी आता राज्यात रात्री पोलिस पेट्रोलिंग सुरू झाले आहे.

  • सरकारी शाळांमधील ११ निवृत्त मुख्याध्यापकांना एक वर्षाची मुदतवाढ.

  • कोविड-19 कलेक्टर्स बिल क्लिअरन्सला परवानगी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT