CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार! मुख्यमंत्र्यांनी दिली 'गुड न्यूज'; सांतिनेज खाडी, साळ नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्राचा निधी

Goa Cabinet Expansion Updates: राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबतही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले. गोवा मंत्रिमंडळातील रिक्त मंत्रीपद लवकरच भरले जाईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पणजीतील सांतिनेज खाडी आणि दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दिल्ली दौऱ्यानंतर मंगळवारी गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीतील बैठकीदरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी राज्यातील विविध जलस्रोतांचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी पणजीतील सांतिनेज खाडी आणि दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक निधी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या दोन्ही जलस्रोतांमधील वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा प्रश्न आणि पर्यावरणीय ऱ्हास याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, दिल्ली दौऱ्यात राज्याशी संबंधित विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्यायाशी निगडित विषयांवर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक घडामोडी

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनुसूचित जमाती (एसटी) समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. या संदर्भातील चर्चा पुढे सरकत असून विविध मागण्यांचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित घटकांशी संवाद साधण्याबरोबरच आवश्यक प्रक्रियांना गती देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळातील रिक्त पद लवकरच भरणार

राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबतही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले. गोवा (Goa) मंत्रिमंडळातील रिक्त मंत्रीपद लवकरच भरले जाईल, असे सांगत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना दुजोरा दिला. मात्र, संभाव्य नावांबाबत किंवा विस्ताराच्या कालमर्यादेबाबत त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT