Goa Cabinet Expansion Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Expansion: पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्र्यांची भूमिका कायम; राजकीय हालचालींना वेग

Goa Cabinet Expansion 2026: राज्य मंत्रिमंडळात रिक्त असलेली एक जागा फोंडा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भरण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्कंठा वाढवली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य मंत्रिमंडळात रिक्त असलेली एक जागा फोंडा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भरण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्कंठा वाढवली आहे. तत्कालीन कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह अकरा सदस्य आहेत. ४० सदस्यीय विधानसभेत बारा सदस्यीय मंत्रिमंडळ नेमता येते.

विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री स्व. रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ते जिंकल्यास त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळेल की नाही, याविषयी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही याविषयी स्पष्ट भाष्य केले नाही. पुन्हा विचारणा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी फोंडा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागा मी भरेन, एवढेच मला सांगायचे आहे, असे नमूद केले.

राज्याच्या राजकारणात सध्या फोंडा पोटनिवडणुकीभोवती उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागेवरून चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “निकालानंतरच निर्णय” अशी भूमिका घेतल्याने राजकीय गणिते आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. दिवंगत माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अजूनही भरलेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी देत सहानुभूतीची लाट आणि राजकीय वारसा यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ विजय मिळवणे पुरेसे ठरणार की त्यांना थेट मंत्रिपदाची संधी दिली जाणार, हा खरा प्रश्न आहे. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह अकरा सदस्य असून, आणखी एका मंत्र्याची जागा भरण्याची घटनात्मक मुभा आहे. त्यामुळे ही रिक्त जागा कोणाच्या गळ्यात पडते, यावरून सत्तेतील अंतर्गत समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

...राजकीय संदेश!

मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक अस्पष्टता ठेवत राजकीय शक्यता खुल्या ठेवल्या आहेत. यामागे केवळ पोटनिवडणुकीचा निकाल नव्हे, तर पक्षांतर्गत संतुलन, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि आगामी राजकीय संदेश यांचा विचार दडलेला दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT