Goa Cabinet:  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: राज्यातील आणखी 2 मंत्र्यांना मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू? दक्षिण गोव्यातील दोघांना मिळणार संधी...

लोकसभेची दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यासाठी भाजपने कसली कंबर

Akshay Nirmale

Goa Cabinet Reshuffle: देशातील तीन प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून गोव्यात पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेषत: दक्षिण गोव्यातील लोकसभेची जागा जिंकण्यासाठी, भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेसचा खासदार आहे. ही गोष्ट भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना खुपते.

यापुर्वी फोंड्यातील सभेतून या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी रणशिंग फुंकले होते.

या जागेसाठी विविध जोडण्या भाजप करत आहे. त्यासाठीच मंत्रीमंडळात पुन्हा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच नीलेश काब्राल यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद दिले गेले.

दरम्यान, मंत्रीमंडळातील आणखी दोन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या आणखी दोघांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते.

मुख्यमंत्र्यांनीही याची शक्यता नाकारली नाही. त्यांनी रविवारीच गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला होता.

भाजपच्या हायकमांडकडून मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या दोन मंत्र्यांची नावे निश्चित्त करण्यात आलेली आहेत, असे समजते. यात एक जण उत्तर गोव्यातील दुसरा दक्षिण गोव्यातील आहे.

तर मंत्रीमंडळात ज्यांना संधी दिली जाणार आहे ते दोघेही दक्षिण गोव्यातील असतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, आलेक्स सिक्वेरा हे देखील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांच्या गटातील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: ही निवडणूक की दहशतीचा खेळ?

Asian Games 2026: कमलजीत आणि सुरुचीचा 'गोल्ड' निशाणा! नेमबाजीत भारतानं जिंकलं सुवर्णपदक; कोरियाच्या तगड्या आव्हानाला दिलं चोख प्रत्युत्तर

IND vs WI: रोहित-विराट पुन्हा मैदानात! भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा थरार कधीपासून? मोबाईल, टीव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहता येणार सामने?

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT