गोवा

Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

Pramod Sawant On Goa Budget: आमच्‍या सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा आहे. माटोळीतील फळांप्रमाणेच अर्थसंकल्‍पातून सर्वांना सर्वकाही देण्‍यात आले आहे.

Sameer Amunekar

पणजी: आमच्‍या सरकारचा अर्थसंकल्‍प हा चिप्‍सच्‍या पाकिटासारखा नव्‍हे, तर चतुर्थीच्‍या माटोळीसारखा आहे. माटोळीतील फळांप्रमाणेच अर्थसंकल्‍पातून सर्वांना सर्वकाही देण्‍यात आले आहे. आमदारांनी अर्थसंकल्‍पावर टीका करण्‍यापूर्वी आपल्‍या मतदारसंघाला काय मिळाले याचा विचार करावा, असे म्‍हणत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्ताधारी गोविंद गावडे यांच्‍यासह विरोधी आमदारांना टोला लगावला.

गेले तीन दिवस चाललेल्‍या अर्थसंकल्‍पावरील चर्चेला उत्तर देत असताना मुख्‍यमंत्री सावंत यांनी काही नव्‍या घोषणाही सभागृहात केल्‍या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍यासह इतर विरोधी आमदारांनी अर्थसंकल्‍पातील आर्थिक तरतुदींवर टीका केली. भाजप सरकार दरवर्षी केंद्र सरकार आणि खुल्‍या बाजारातून कर्ज काढून राज्‍य चालवत आहे. त्‍यामुळे राज्‍यावरील कर्जाचा बोजा वाढत असल्‍याचा आरोप त्यांनी केला.

त्‍यावर बोलताना, राज्‍य सरकारने गेल्‍या काही वर्षांत मर्यादेपेक्षा खूप कमी कर्ज केंद्र सरकारकडून घेतलेले आहे. केंद्राकडून राज्‍याला जे कर्ज मिळते ते बिनव्‍याजी आणि ५० वर्षांसाठी असते. पुढील ५० वर्षांनंतरही केंद्रात आणि राज्‍यात भाजपचेच सरकार असेल, त्‍यामुळे ते माफही होईल, असे म्‍हणत मुख्‍यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्‍युत्तर दिले.

दरम्‍यान, सरकारने यंदा मांडलेल्‍या अर्थसंकल्‍पाद्वारे राज्‍याचा सर्वच क्षेत्रांमध्‍ये विकास घडवून आणण्‍याची हमी मुख्‍यमंत्री सावंत यांनी दिली.

खासगी क्षेत्रातील महिलांना ‘कदंब’ प्रवासात ५० टक्‍के सूट

मुख्‍यमंत्र्यांच्‍या प्रमुख घोषणा

 आगामी काळात कदंब महामंडळाला अधिकाधिक बळकटी देण्‍याबरोबरच खासगी क्षेत्रात काम करण‍ाऱ्या महिलांना कदंब बसच्‍या प्रवास भाड्यात ५० टक्‍के सूट.

कर्मचारी भरती आयोग आणि लोकसेवा आयोगामार्फत सरकारी नोकरीतील सुमारे अडीच हजार पदे भरणार.

संजीवनी साखर कारखान्‍याच्‍या जागेत इथेनॉल प्रकल्‍प सुरू करण्‍यासाठी एका महिन्‍यात निविदा जारी करणार.

खनिज डंपचा पुढील दोन महिन्‍यांत लिलाव करणार. उर्वरित चार खाण ब्‍लॉकच्‍या लिलावाची प्रक्रियाही सुरू.

पारंपरिक रेती उपशाचा विषय केंद्र सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवणार.

येत्‍या २ ऑक्‍टोबरला राज्‍याला शंभर टक्‍के प्‍लास्‍टिकमुक्त बनवण्‍याचा निर्णय जाहीर करणार.

विशेष शाळांमध्‍ये शिकणाऱ्या ज्‍या दिव्‍यांग विद्यार्थ्यांकडे कौशल्‍य आहे, अशा पात्र असलेल्‍यांना सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT