Goa Assembly Budget 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Tax Changes: अर्थसंकल्पात दिलासादायक घोषणांची शक्यता; काय असणार 'खर्चा'चं नवं गणित?

CM Pramod Sawant: सामान्य जनतेला काय मिळणार, कोणत्या वस्तू महागणार आणि कोणत्या स्वस्त होणार, आणि कोणत्या विभागांना किती निधी मिळेल?

Akshata Chhatre

पर्वरी: बुधवार, २६ मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या चर्चेनंतर सायंकाळी अर्थसंकल्पाचे गुपित उघड होईल. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी असल्याने, तेच हा महत्त्वाचा दस्तावेज सादर करतील. या अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला काय मिळणार, कोणत्या वस्तू महागणार आणि कोणत्या स्वस्त होणार, आणि कोणत्या विभागांना किती निधी मिळेल, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय स्वस्त होणार?

यंदाच्या अर्थसंकल्पात कडधान्ये आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसते. नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाला मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे.

पर्यटनावर आधारित असलेल्या गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यटन आणि रस्ते वाहतूक विभागाला योग्य निधी मिळू शकतो. ग्रामीण आणि शहरी विकासासाठीही सरकार आर्थिक तरतूद करू शकते. आरोग्य आणि कृषी क्षेत्रासाठी नवीन योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महागाईचे संकेत

पर्यटन क्षेत्राशी संबंधित काही वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. मद्य, फेणी आणि इतर पेय पदार्थांच्या किमती वाढू शकतात. तंबाखू आणि इतर व्यसनयुक्त पदार्थांवरही कर वाढण्याची शक्यता आहे. मोबाईल, एसी, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गाड्या महाग होऊ शकतात. वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या मत्स्यव्यवसायात सरकार काय बदल करते, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

SCROLL FOR NEXT