Egg prices in Goa Dainik Gomantak
गोवा

Egg price: ब्रॉयलर अंडी झाली स्वस्त; 70 रु. डझन, आवक वाढली; डझनमागे 20 रुपयांनी घट

Egg prices in Goa: सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या ब्रॉयलर अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या ब्रॉयलर अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्‍यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून प्रतिडझन ९० रुपये असलेले अंड्यांचे दर आता सुमारे २० रुपयांनी कमी होऊन ७० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

गेल्या श्रावण महिन्यानंतर अंड्यांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. काही काळ शंभर अंड्यांमागे सुमारे ६९० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. मात्र सध्या या दरात मोठी घट होऊन शंभर नगामागे सुमारे ५०० रुपये इतके दर झाले आहेत.

श्रावण महिन्यात अंड्यांचे दर ६० ते ७० रुपये डझन होते. त्यानंतर ते ८० रुपये आणि पुढे ९० रुपयांपर्यंत गेले. मासळीची आवक वाढल्यानंतर दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दर चढेच राहिले. आता मागणी कमी झाल्याने आणि पुरवठा वाढल्याने दरात घट झाली आहे.

गावठी अंडी मात्र अडीचशे रुपये डझन

बाजारात गावठी अंडी क्वचितच उपलब्ध होत असतात. त्‍यामुळे त्यांचे दर अजूनही चढेच आहेत. सध्या गावठी अंडी सुमारे अडीचशे रुपये डझन या दराने विकली जात आहेत. विशेष म्‍हणजे तरीसुद्धा या अंड्यांना मोठी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT