Chicken Price Hike Dainik Gomantak
गोवा

Chicken Price Hike: भर उन्हाळ्यात ब्रॉयलर चिकनचे दर 'भडकले', किलोमागे 30 रुपयांनी वाढ; तरीही मागणी

goa broiler chicken price hike summer: एकाबाजूने तुटवड्यामुळे मासळी महाग झाली असतानाच आता ब्रॉयलर चिकनही महाग झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: एकाबाजूने तुटवड्यामुळे मासळी महाग झाली असतानाच आता ब्रॉयलर चिकनही महाग झाले आहे. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री बसत असून जिभेवरही लगाम घालावा लागत आहे. मात्र चिकन महाग झाले असले तरी हॉटेल व रेस्टॉरंटमधून मागणी कायम असल्याने डिचोलीतील चिकन विक्रीवर मोठा परिणाम झालेला नाही. चिकन विक्रेत्यांकडूनही तसे संकेत मिळाले आहेत.

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त ब्रॉयलर चिकन महाग झाल्यानंतर त्याचे दर पूर्वपदावर आले होते. मात्र आता ब्रॉयलर चिकन पुन्हा महाग झाले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून डिचोलीत ब्रॉयलर कोंबड्यांची आवक होत असते.

दर २०० रुपयांवर

महिनाभरापूर्वी ब्रॉयलर कोंबडीचे दर १६० ते १७० रुपये प्रतिकिलो होते. मात्र आता हाच दर २०० रुपयांवर पोहोचला आहे. नॅट (सुटे) ब्रॉयलर चिकनचे दर तर ३०० ते ३२० रुपयांपर्यंत गेले आहेत.

सामान्य खवय्यांसाठी हे चिकन परवडेनासे झाले आहे. डिचोली शहरातील विविध चिकन सेंटरमधून दररोज सुमारे दोन हजार किलो ब्रॉयलर चिकनची विक्री होत आहे. बुधवारी व रविवारी मात्र त्यात वाढ होत असते, अशी माहिती विक्रेत्यांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT