2.15 lakh women screened for breast cancer in Goa Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

96 women diagnosed with breast cancer in Goa: राज्यात ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत २ लाख १५ हजारांहून अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत २ लाख १५ हजारांहून अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ३,९२५ महिलांमध्ये संशयित लक्षणे आढळली, तर ९६ महिलांना कर्करोगाचे निदान झाले. २०२७ अखेरपर्यंत वयोमर्यादेत बसणाऱ्या राज्यातील सर्व महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने ठेवले आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०२१ मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनच्या (यूवीकॅन) सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ‘आयब्रेस्टएक्झाम’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता तपासणी सेवा थेट महिलांपर्यंत पोहोचविणे हा यामागील उद्देश आहे. उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आणखी ५० हजार महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य आहे.

आरोग्‍यसेवा दारापर्यंत पोहोचविणार : मंत्री विश्‍‍वजीत राणे

महिलांनी तपासणीसाठी रुग्णालयात येण्याची वाट न पाहता आरोग्यसेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यावर सरकारचा भर आहे. राज्यातील प्रत्येक पात्र महिलेची तपासणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. जयप्रकाश तिवारी यांनी सांगितले, की या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील तपासणी आणि पुढील उपचारांसाठीची संदर्भ सेवा अधिक सक्षम झाली आहे.

सरकारी आरोग्य केंद्रे, जनजागृती आणि समुदायस्तरीय मोहिमांद्वारे तपासणी केली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच संशयित महिलांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे सुरवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे तपासणीबरोबरच वेळेवर निदान आणि उपचारांवर भर देण्यात येत आहे. ३० वर्षांवरील जवळपास ८० टक्के महिलांपर्यंत या उपक्रमाद्वारे पोहोचण्यात यश आले आहे.

- डॉ. अनुपमा बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Cyber Fraud Safety Tip: दिवाळीत शॉपिंग करताना सावधान! 80 टक्के डिस्काउंटच्या नावाखाली सायबर भामटे घालू शकतात गंडा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Indian Football League: 2 सामन्यांत 2 विजय! धेंपो क्लबची विजयी घोडदौड कायम; समलेश्वरीवर 2-1 ने मात

ISL Football: 2 स्पॅनिश खेळाडूंचे गोल, नॉर्थईस्टचा विजय! चर्चिल ब्रदर्सची पराभवाची हॅट्ट्रिक; 4 सामन्यांत 10 गोल स्वीकारले

SCROLL FOR NEXT