Goa news today Dainik Gomantak
गोवा

Goa News: महाराष्ट्रात दारूच्या किमतींमध्ये वाढ; गोव्यातील व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील महत्वाच्या बातम्या मराठीमध्ये

गोमंतक ऑनलाईन टीम

महाराष्ट्रात दारूच्या किमतींमध्ये वाढ; गोव्यातील व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता

महाराष्ट्रात दारूच्या किमतींमध्ये प्रस्तावित वाढ - भारतीय बनावटीच्या आणि परदेशी ब्रँड दोन्ही - गोव्यातील व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. गोव्यात तुलनेने स्वस्त दर असल्याने, सीमापार मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

70% हून अधिक अपघात 'रेंट अ कॅब' मुळेच - मुख्यमंत्री

दक्षिण गोव्यासाठी रेड अलर्ट

आयएमडीने आज दक्षिण गोव्यासाठी रेड अलर्ट आणि उत्तर गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

औद्योगिक वसाहत मधून चोरीस गेलेला ट्रक ताब्यात

कुंडई येथील औद्योगिक वसाहत मधून चोरीस गेलेला ट्रक ताब्यात घेण्यात म्हार्दोळ पोलिसांना यश. राजकुमार विश्वकर्मा (उत्तर प्रदेश ) याला म्हार्दोळ पोलिसांनी केली अटक.

स्थानिकांचा जेट्टी प्रकल्पाला विरोध; आमदार काब्राल यांची भेट

शेळवण कुडचडे येथील रहिवाशांनी झेलवोना येथे प्रस्तावित लोडिंग आणि अनलोडिंग जेट्टी आणि रेल्वे ओव्हरब्रिजला विरोध करण्यासाठी आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेतली. मेसर्स दिनार तारकार अँड कंपनीला जेट्टीसाठी सीआरझेड मंजुरी मिळाली आहे, परंतु स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाबाबत एनजीटी (पुणे) मध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. आमदार काब्राल यांनी दोन्ही प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

बेकायदेशीर रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त

केरी फोंडा येथून बेकायदेशीर रेती वाहतूक करणारा ट्रक म्हार्दोळ पोलिसांनी केला जप्त. चालक कणकप्पा बिरादार (नागा मस्जिद, कुर्टी) याला अटक.

"विघ्नसंतोषी लोकांना विकास नकोय" विनय तेंडुलकर (माजी राज्यसभा खासदार )

भारतीय जनता पक्षाचे सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत आहे.काही विघ्नसंतोषी लोकांना हा विकास झालेला नको आहे. फोंडा येथे रस्त्याचे डांबरीकरण काम चालू होते ते काम थांबवले.

सत्तरीतील वन हक्क दावेदारांसाठी आयोजित शिबिराला सुरुवात

वाळपईत, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सत्तरीतील वन हक्क दावेदारांसाठी (एफआरसी) आयोजित शिबिराला सुरुवात. एकाच दिवसात जास्तीजास्त फाईल मंजूर करण्याचा असणार प्रयत्न. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची वाढदिवसानिमित्त प्रार्थना

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त फातोर्डा येथील दंबाब लिंगासमोर प्रार्थना केली.

गावणे- बांदोडा येथील रस्त्यावर म्हशीला स्कुटरची धडक बसून तरुणाचा मृत्यू

गावणे- बांदोडा येथील रस्त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा म्हशीला स्कुटरची धडक बसून दिक्षय गुरूदास गावडे (३१, गावणे) याचा मृत्यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT