Goa today live updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा समग्र शिक्षा आर्थिक फसवणूक प्रकरणातील सुरू असलेला तपास अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे वर्ग, वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

गोवा समग्र शिक्षा आर्थिक फसवणूक प्रकरणातील सुरू असलेला तपास अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे वर्ग

गोवा समग्र शिक्षा आर्थिक फसवणूक प्रकरणातील सुरू असलेला तपास अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

केरळ एर्नाकुलम येथे रंगली पुस्तक चर्चा आणि कविता संमेलन

केरळ एर्नाकुलम येथे केरळ सरकारच्या कोंकणी साहित्य अकादमीच्यावतीने आयोजीत पुस्तक चर्चासत्रात केरळचे प्रसिद्द कोंकणी लेखक आर.एस.भास्कर यांच्या 'ब्रह्मर्षी श्रीनारायण गुरु' या पुस्तकावर रंगली चर्चा. पुस्तक चर्चा सत्रानंतर झालेल्या कविता वाचन कार्यक्रमात श्रीकला सुखादिया, अंडिकडवु सुरेश पै, जया बालकृष्ण कामत,बाबू आलिंगल, पी.एस.माया,एन.मंगळाबाय आनी आर.रामानंद प्रभु यांनी सहभाग घेतला होता.

हिस्ट्री शीटर चंद्रकांत याला अटक

भाटली येथील तक्रारदाराच्या भाड्याच्या खोलीत घुसून १९,००० रुपयांच्या मोबाईल फोन आणि रोख रकमेची चोरी केल्याच्या आरोपाखाली पणजी पोलिसांनी हिस्ट्री शीटर चंद्रकांत कृष्णा केनावडेकर (६५, चिंबल) याला अटक केली.

गोवा पोलिसांकडून अंमलीपदार्थांवर छापा

पणजी पोलिसांनी गोवा तिसवाडी, कंपाल येथील बीडी ग्राउंडजवळ अमली पदार्थांवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान, संशयित आरोपी युराज, वय २७, बेतीचा रहिवासी, याला १००० ग्रॅम वजनाचा संशयास्पद गांजासह रंगेहाथ पकडण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे १,००,०००/- आहे.

अचानक भटकी कुत्री आल्याने स्कुटर कोसळून आई व मुलगी जखमी

म्हार्दोळ येथील बगल रस्त्यावर अचानक भटकी कुत्री आल्याने स्कुटर कोसळून आई व मुलगी जखमी. फोंडा उपजिल्हा इस्पीतळात उपचार सुरु.

रुग्णांशी नीट बोला आणि वागा, अन्यथा घरी चला!

कोनाडी कोरगाव येथील मशीद मध्ये आज "ईद अल अज्हा "बकरी ईद साजरा

कोनाडी कोरगाव येथील मशीद मध्ये आज "ईद अल अज्हा "बकरी ईद साजरा. यावेळी पेडणे तालुक्यातील मोठ्या संख्यने मुस्लिम बांधव उपस्थित राहून नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी येथील स्थानिक पंच अब्दुल नाईक यांनी ईद विषय माहिती देत शुभेच्छा दिल्या.

"डॉक्टरांच्या बदल्या लवकरच होणार" आरोग्यमंत्री विश्वजित राणे

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, डॉक्टरांच्या बदल्या लवकरच होणार आहेत. एका नवीन योजनेअंतर्गत, जीएमसीमध्ये त्यांचे बंधन पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागात नियुक्त केले जाऊ शकते. वरिष्ठ आणि निवासी डॉक्टरांचे वेतन वाढवण्यात आले आहे आणि सुधारित पायाभूत सुविधांसह तज्ञांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

व्यावसायिक वापरासाठी खाजगी वाहने वापरणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी अध्यादेश जारी

व्यावसायिक वापरासाठी खाजगी वाहने वापरणाऱ्या भाड्याने घेतलेल्या कार आणि दुचाकी चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला.

'ईद'मुबारक..!.

डिचोलीत 'बकरी ईद'चा उत्साह. एकमेकांना आलिंगन देत डिचोलीत 'ईद'च्या शुभेच्छा. नमाजमध्ये ज्येष्ठ मुस्लिम बांधवांसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग.

कुर्बानीसाठी जमावबंदी लागू कडक पोलीस बंदोबस्त

गोवा मांस प्रकल्पात कुर्बानीसाठी जमावबंदी लागू केल्याने परिसरात कडक पोलीस बंदोबस्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT