Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa News: वारखंडे जाळपोळ प्रकरणात दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

"ज्यांची स्वतःची विश्वासार्हता शून्य, ते 'आप'वर प्रश्न विचारतायत"; आमदार वेन्झी

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा एक मत जास्त मिळाल्यानंतर, हे मत 'आप'चे असावे असे तर्कवितर्क लढवले जात होते. यावर प्रत्युत्तर देताना वेन्झी व्हिएगस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

'बर्च' अग्निकांड: सरपंच रोशन रेडकर आणि सचिव रघुवीर बागकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात क्लबला दिलेले परवाने आणि ना हरकत दाखले (NOC) संशयाच्या भोवऱ्यात होते. या कागदपत्रांच्या प्रक्रियेत अनियमितता केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सरपंच आणि सचिवांच्या भूमिकेची चौकशी सुरू केली होती.

वारखंडे अपघात जाळपोळ प्रकरणात दोघांना अटक

वारखंडे अपघात मशीन जाळपोळ प्रकरणात महमद दादापीर शेख (31, शापूर - बांदोडा) आणि मींतेश उर्फ बबलू नाईक (35, वारखंडे) यांना फोंडा पोलिसांकडून अटक.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूक: भाजपला अपेक्षित आकड्यापेक्षा 1 मत जास्त

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये एकूण २५ जागा आहेत. नुकत्याच झालेल्या निकालांनुसार आणि आजच्या मतदान प्रक्रियेनुसार स्थिती खालीलप्रमाणे स्पष्ट झाली आहे:

पक्ष/आघाडीनिवडून आलेले सदस्यप्रत्यक्ष मिळालेली मते: भाजप (BJP)११ मगोप (MGP - मित्रपक्ष)०२ अपक्ष (भाजप समर्थक)०२ एकूण (सत्ताधारी आघाडी) १५ काँग्रेस + गोवा फॉरवर्ड (आघाडी)०९ आम आदमी पक्ष (AAP)०१

तिसऱ्या जिल्ह्याचा निर्णय म्हणजे घाईघाईचा प्रकार; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

आज (३० डिसेंबर २०२५) मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्ष तिसऱ्या जिल्ह्याच्या विरोधात नाही, मात्र ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला जात आहे, ती पद्धत चुकीची आहे.

गोव्याचा तिसरा जिल्हा निश्चित; 5 तालुक्यांचा समावेश, सभापती गणेश गावकर यांची माहिती

३० डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर सभापती गणेश गावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. हा नवीन जिल्हा प्रामुख्याने गोव्याच्या दक्षिण आणि पूर्व भागातील डोंगराळ तालुक्यांचे प्रतिनिधित्व करेल.

सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार, खालील पाच तालुक्यांचा समावेश या नवीन जिल्ह्यात होणार आहे: १. सावर्डे (Sanvordem) २. सांगे (Sanguem) ३. केपे (Quepem) ४. कुडचडे (Curchorem) ५. काणकोण (Canacona)

गोव्याचा तिसरा जिल्हा: आज होणार अंतिम निर्णय

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दुपारी सर्व आमदारांशी चर्चा करून या जिल्ह्याचा 'फायनल शेप' म्हणजेच त्याचे स्वरूप निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायत: रेश्मा बांदोडकर अध्यक्ष, तर नामदेव चारी उपाध्यक्षपदी नियुक्त

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने निर्भेळ यश मिळवल्यानंतर, पक्षाने या दोन अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे.

आगोंद किनाऱ्यावर नाताळच्या रात्री 'ऑलिव्ह रिडले'चे आगमन; ४४१ अंड्यांची नोंद

काणकोण तालुक्यातील आगोंद हा समुद्रकिनारा कासवांच्या प्रजननासाठी (Turtle Nesting) जगभरात प्रसिद्ध आहे. नाताळच्या उत्सवाच्या रात्री, म्हणजेच २५ डिसेंबर रोजी, एका मादी 'ऑलिव्ह रिडले' कासवाने या किनाऱ्यावर सुरक्षित जागा शोधून तब्बल ४४१ अंडी घातली. या हंगामातील आगोंद किनाऱ्यावरील कासवाच्या आगमनाची ही दुसरी वेळ आहे.

कळंगुट पोलीस स्थानक ठरले गोव्यातील सर्वोत्तम

रविवारी झालेल्या एका विशेष समारंभात कळंगुट पोलीस स्थानकाला 'सर्वोत्तम पोलीस स्थानक २०२५' (Best Police Station in Goa) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील कार्यक्षमता, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि जनतेला दिलेल्या तत्पर सेवेची दखल घेऊन हा अधिकृत ट्रॉफी आणि सन्मान देण्यात आला आहे.

चोरला घाटात पहाटे टेम्पोला भीषण आग; 5लाखांचे नुकसान, वाळपई अग्निशमन दलाची धाव

आज, ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरला घाटातील 'वडले तुम' भागात एका टेम्पोला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते, मात्र वाहनाचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल' चिंबलातच, सरकार ठाम; आंदोलकांचाही पवित्रा कायम, प्रकल्‍प 'तोयार'च्‍या प्रभाव क्षेत्रात की बाहेर? शुक्रवारी पाहणी

Ganesh Jayanti 2026: श्री गणरायाचे 3 अवतार कोणते? काय आहे त्यामागचे महत्व? वाचा..

Chimbel Unity Mall: "25 कोटी खर्च झालेत, आता माघार नाही!", युनिटी मॉल हलवण्यास सरकारचा नकार; मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर ग्रामस्थ काय उचलणार पाऊल?

Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

SCROLL FOR NEXT