Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: थकीत बिलाच्या रकमेच्या आकडेवारीत गणिती चुका, अमित पाटकरांचा आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News 26 July 2025: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी.

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

"थकीत बिलाच्या रकमेच्या आकडेवारीत गणिती चुका" अमित पाटकर

"सरकारचीच खातीच वीज बिलांचे थकीत. गोमेकॉचे २.८९ कोटींचे बील थकी, वीज खातेच स्वतःचे ७४.८र कोटींचे थकीत. थकीत बिलाच्या रकमेच्या आकडेवारीत गणिती चुका." अमित पाटकर.

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पती मैनुद्दीन हवांगीला दहा दिवसांची पोलिस कोठडी

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी पती मैनुद्दीन हवांगीला दहा दिवसांची पोलिस कोठडी. शुक्रवारी वाठादेव-डिचोली येथे नवऱ्याकडून पत्नीचा खून करण्याची घटना

साखळी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

डिचोली पोलिसांनी साखळी येथील कुडणे येथील रहिवासी मिलेश गुरव याच्याविरुद्ध गोकुळवाडी, साखळी येथील रहिवाशांना धमकावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे, ज्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरव हा सध्या वाळपई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे.

"POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

आम्ही POGO बाबत कधीही तडजोड करणार नाही. आर्थिक विकास, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाच्या बाबतीत गोवा इतर राज्यांपेक्षा मागे आहे. म्हणूनच गोव्यातील मूळ व्यक्ती (POGO) आवश्यक आहे. एक दिवस विधानसभेत POGO विधेयक मंजूर होईल : मनोज परब

"पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

गोव्याचे नवे राज्यपाल पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो. ते राज्याच्या कारभारात आणि प्रशासनात आपले मार्गदर्शन करतील: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

"गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

"गोव्यात येऊन मला आनंद झाला आहे, मला स्थानिक भाषा येत नाही. पण सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे"; गोव्याचे नवे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू.

२९ जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

आयएमडी गोव्याने २९ जुलै २०२५ पर्यंत राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज.

गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

पुसपती अशोक गजपती राजू यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

गेल्या २४ तासांत वाळपईत सर्वाधिक पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत, वाळपई येथे सर्वाधिक १०५.५ मिमी पाऊस पडला, तर पणजी येथे सर्वात कमी २२.८ मिमी पाऊस पडला.

"भारतीय सैनिकांची आठवण सदैव आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे"

"भारतीय सैनिकांची आठवण सदैव आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे" नगराधक्ष प्रसन्ना गावस. गोयकर निवृत्त सैनिक संघ तर्फे वाळपई शहीद स्तंभ येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा.

फोंडा येथील क्रांती मैदानावर कारगिल विजय दिवस साजरा

फोंडा येथील क्रांती मैदानावर कारगिल विजय दिवस साजरा. नगराध्यक्ष आनंद नाईक, कर्नल नीरज नौटीयाल, पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT