Farm Dainik Gomantak
गोवा

Goa Farmer: ओसाड माळरानात फुलवले नंदनवन; गोव्याच्या बाली बोरकरांची करामत

Goa Farmer: बोरी अतिदुर्गम भागात रहाणाऱ्या बाली बोरकरांनी ओसाड माळरानावर नंदनवन फुलवले आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला पारंपरिक शेती-बागायतीचा व्यवसाय सोडून दिला आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई, कामगारांचा पगार, खत, बी-बियाणे यांचा खर्च गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेतक-यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. मात्र तरीही पाणीवाडा रुमाणे बोरी या अतिदुर्गम भागात रहाणाऱ्या आत्माराम उर्फ बाली बोरकर यांनी नोकरीमागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देऊन ओसाड माळरानावर नंदनवन फुलवले आहे.

मारुतीगड रुमाणेचा अतिदुर्गम भाग ओलांडल्यानंतर डोंगर माथ्यावर दिसणारी केळीची बने आंबा, माड, काजूची बने पाहून आपण थक्क होऊन जातो. बाली बोरकर 74 वर्षाचे असून त्यांनी 10 हेक्टर भूखंडात 1500 पोकळी, सुपारी झाडे, 300 पेक्षा जास्त काजूची झाडे, 250 हून जास्त आंबा कलमे लावून वाढवली आहेत.

100 हून जास्त माडाची झाडे, 350 केळी, फणस 30 झाडे, कोकमची २५ झाडे लावली आहेत. शिवाय अननस, मिरची, चवळी, वाली, वांगी, याचे पीक घेतले जाते. झेंडूची लागवड केली आहे. शिवाय भेंडी, काकडी, दोडकी, टरबूज, आदी फळे व भाजीपाला यांचे तसेच 6 एकरात भातपीक घेतले जाते. बागायतीत जाण्यासाठी बाली बोरकर यांनी स्वतः रस्ता तयार केला आहे.

सुशिक्षितांना दिला रोजगार

60 गायी, म्हशी असून 6 कामगार त्यांचे पालन करतात. बाली बोरकर यांना रोज 120 लिटर दूध मिळते, त्यापैकी 100 लि. ते गोवा डेअरीला तर 20 लि. गावातील ग्राहकांना देतात. सध्या 4 एकरात गवताची लागवड करतात. विजेऐवजी सौर उर्जेचा ते अधिक उपयोग करतात. धान्य विक्रीची सोसायटी, तसेच दुकानही चालवतात. लागूनच पीठाची गिरण, भात कांडप मशीन आणि नारळाचे तेल काढण्याचा घाणा चालतो. त्यामुळे गावातील युवकांना त्यांनी रोजगार संधी दिली आहे.

सरकारी वाहिनीतून पाणी नाही!

या माळरानावरील बागायतीला 30 लाख लिटर पाणी सोलार पंपद्वारे पुरविले जाते. या तलावातून सरकारी मदतीने पाणी खेचून या धरणात साठवण्याची योजना होती, परंतु चुकीच्या पद्धतीने जलवाहिनी घातल्याने सरकारी वाहिनीतून पाणी खेचले जात नाही. सरकारने सुमारे 20 लाख रुपये खर्चून जी जलवाहिनी घातली, त्यातून 2 इंच पाणी पुरवठा व्हायला हवा होता. तो फक्त अर्धा इंच होतो. चुकीची पाईपलाईन घातल्यामुळे हे घडले, असे बाली बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT