Union Minister of State for Tourism Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa: पर्यटन क्षेत्राला लवकरच चालना; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

कोरोना महामारीमुळे (Covid 19) गोव्यात पर्यटन क्षेत्रावर (Tourism Sector) गंभीर परिणाम झाले आहेत. पर्यटन हे गोव्यासाठीचे (Goa) प्रमुख आर्थिक स्त्रोताचे साधन आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोरोना महामारीमुळे (Covid 19) गोव्यात पर्यटन क्षेत्रावर (Tourism Sector) गंभीर परिणाम झाले आहेत. पर्यटन हे गोव्यासाठीचे (Goa) प्रमुख आर्थिक स्त्रोताचे साधन आहे. त्यामुळे लवकरात लवकर गोव्याच्या पर्यंटन क्षेत्राला चालना देण्यात येईल असे केंद्रीय पर्यंटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Union Minister of State for Tourism Shripad Naik) यांनी मडगावी एका कार्यक्रमात उपस्थित आसल्यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पर्यटनामुळे ज्यांचे  नुकसान झाले आहे अशांना केंद्रीय सरकारच्या ज्या योजना आहेत त्याप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाईल असेही नाईक यांनी पुढे सांगितले.

सात वर्षांपुर्वी आपण सहा ते सात महिन्यांसाठी पर्यटन राज्यमंत्री होतो, तेव्हा गोव्यासाठी काही योजनांचा आरंभ करण्यात आला होता. ज्या योजना अपुऱ्या आहेत त्या पुर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. यात करंझाळे येथील वॉटर स्पोर्ट इन्स्टिट्युट, फर्मागुडी येथील कॅटरीग कॉलेज, यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारकडे चर्चा करुन गोव्यासाठी पर्यटन पॅकेज निश्र्चित केले जाईल असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

आपण आयुष केंद्रीय मंत्री असताना जे प्रकल्प सुरु केले होते त्यात कुठलाही अडथळा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. धारगळ येथील आयुर्वेद-योग इस्पितळाचे काम 60 टक्के पुर्ण झाले आहे. मडगावी मोती डोंगर येथील जिल्हा आयुष इस्पितळाला निधी देण्यात आला आहे. त्याचे कामही सुरु केले जाईल. रायबंदर येथील जुने वैद्यकीय इस्पितळाचा तळमजला सरकारने आयुश इस्पितळासाठी दिली आहे. तेथे मानसीक आरोग्य संदर्भातील 20 खाटांचे इस्पितळ सुरु केले जाईल असेही केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील जुने वैद्यकीय इस्पितळाचा तळमजला सरकारने आयुश इस्पितळासाठी दिली आहे. तेथे मानसीक आरोग्य संदर्भातील 20 खाटांचे इस्पितळ सुरु केले जाईल असेही केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT