Red Bull Four 2 Score Final Dainik Gomantak
गोवा

Red Bull Four 2 Score Final: फोर 2 स्कोअरच्या अंतिम सामन्यात 'बूम बूम गोवा'चा दणदणीत विजय; साल्झबर्गमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज

Red Bull Four 2 Score Final: प्रत्येकी चार खेळाडूंच्या संघांचा समावेश असलेल्या अनोख्या रेड बुल फोर २ स्कोअर फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या बूम बूम गोवा संघानं अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे.

Sameer Amunekar

पणजी: प्रत्येकी चार खेळाडूंच्या संघांचा समावेश असलेल्या अनोख्या रेड बुल फोर २ स्कोअर फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या बूम बूम गोवा संघानं अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह, बूम बूम गोवा संघ आता ऑस्ट्रियातील साल्झबर्ग येथे होणाऱ्या रेड बुल फोर २ स्कोअर वर्ल्ड फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

एफसी गोवाच्या चार खेळाडूंनी मोठ्या मंचावर त्यांच्या संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार राष्ट्रीय अंतिम फेरीतील कर्णधारांविरुद्ध एक रोमांचक सामना खेळला. या सामन्यात खेळाडूंच्या कौशल्याचा उत्तम आविष्कार पाहायला मिळाला.

बूम बूम गोवा संघानं जबरदस्त कामगिरी करत इतर सर्व संघांना पराभूत केले आणि विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. नीरज पारेख, प्रजत नाईक, मेहबूब हुबळीकर, साईदीप पोंबुर्फेकर या फुटबॉलपटूंनी बूम बूम गोवा संघाचं प्रतिनिधित्व केलं.

भारतातील सर्वोत्तम संघांनी या प्रतिष्ठित रेड बुल फोर २ स्कोअर स्पर्धेत १२ शहरांमधील संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना गोव्यात पार पडला.

अंतिम सामन्यात बूम बूम गोवा संघानं अपराजित कामगिरी करत विजेतेपदकाला गवसणी घातली. बूम बूम गोवा संघ या वर्षाच्या अखेरीस रेड बुल फोर २ स्कोअर वर्ल्ड फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

२०२३ मध्ये जर्मनीत झालेल्या रेड बुल फोर २ स्कोअर वर्ल्ड फायनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बूम बूम गोवा संघानं गेल्या आवृत्तीतील भारतातील विजेत्या रेड बुल फोर २ स्कोअर दिल्ली अ‍ॅव्हेंजर्सचा २-१ असा पराभव करून आपली ताकद सिद्ध केली होती.

२०२५ च्या आवृत्तीत, मुंबई क्वालिफायर्समध्ये कडव्या स्पर्धेत विजय मिळवत, बूम बूम गोवाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवली होती. जयेश सुतार, कृष्णा गावस, दिशु सिंग, चेअरन कोमरप्रांत आणि कर्णधार व्हॅलेरियन रॉड्रिग्ज या पाच जणांनी दमदार कामगिरी करत इंडिया फायनलसाठी पात्रता मिळवली होती.

संघाचा कर्णधार व्हॅलेरियन रॉड्रिग्जनं आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "रेड बुल फोर २ स्कोअर नॅशनल फायनल जिंकणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. आम्ही या स्पर्धेत आमचं सर्वस्व पणाला लावलं. आम्ही आता ऑस्ट्रियातील साल्झबर्गमध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी सज्ज आहोत."

गेल्या वर्षी जर्मनीतील रेड बुल फोर २ स्कोअर वर्ल्ड फायनलमध्ये फुटबॉल चाहत्यांना चित्तथरारक लढतींचा आनंद लुटता आला. या स्पर्धेत नेदरलँड्सच्या मिश्र संघाने विजेतेपद पटकावले, तर महिला गटात ब्राझीलने आरबी लाइपझिग अरेना संघानं बाजी मारली.

बूम बूम गोवा संघानं नॅशनल फायनलमध्ये वर्चस्व गाजवत भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकावला आहे. आता या संघाचं ध्येय ऑस्ट्रियातील साल्झबर्ग येथे होणाऱ्या वर्ल्ड फायनलमध्ये चमकदार कामगिरी करून इतिहास रचण्याचे आहे.

फोर २ स्कोअर स्पर्धेतील प्रत्येक सामना १० मिनिटांचा असतो. सामन्यात कोणताही ब्रेक नसतो. तसंच गोलकीपरही नसतो. पहिल्या आणि शेवटच्या मिनिटाला गोल झाल्यास दोन गुण दिले जातात. प्रत्येकी एक खेळाडू समोरासमोर उभा राहून विजयी गोल करण्यासाठी झुंज देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT