vishwajit rane On Bondla Wildlife Sanctuary  Dainik Gomantak
गोवा

Bondla Wildlife Sanctuary : बोंडला प्राणिसंग्रहालयाची परिस्थिती बिकट- वनमंत्र्यांची कबुली

सुधार योजनेवर दीडशे कोटींचा खर्च अपेक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

Bondla Wildlife Sanctuary बोंडलातील निसर्ग पर्यटन संकुलाची परिस्थिती बिकट आहे, अशी कबुली वनमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत दिली. आमदार क्रुझ सिल्वा यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. राणे म्हणाले, बोंडला येथे राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे.

मात्र, तेथील परिस्थिती देशातील इतर राज्यांतील प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत बरी नाही. गेले वर्षभर त्या ठिकाणी बृहद्आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात यश आलेले नाही. खुद्द वनमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

प्राणिसंग्रहालय सुधार योजनेवर किमान 150 कोटी रुपये खर्च येईल. एकाचवेळी तेवढा निधी उपलब्ध होणार नाही. टप्प्याटप्प्याने हे काम करणे योग्य होणार नाही. मात्र, तसे करावे लागेल, असेही राणे म्हणाले.

आमदार सिल्वा म्हणाले, लहानपणी बोंडला अभयारण्यातील प्राणिसंग्रहालय आकर्षण होते. आता तसे ते राहिले नाही. आता शाळांच्या सहलीही तेथे जात नाहीत. तेथे सरकारने लक्ष पुरवण्याची गरज आहे. बृहदआराखडा केला असेल तर त्यातील ठळक बाबी कोणत्या, ते समजले पाहिजे.

त्यांना उत्तर देताना वनमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले, आपण मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. १९६९ मध्ये प्राणिसंग्रहालय खुले केले तरी त्यात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही.

टप्प्याटप्प्याने हे काम करता येणार नाही. एकाचवेळी प्राणिसंग्रहालयाला नवे रूपडे द्यावे लागणार आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. एका वर्षात परिवर्तन करता येणार नाही,असेही वनमंत्री राणे यांनी सांगितले.

प्राणी दत्तक योजना

प्राणी दत्तक योजनेसाठी फाउंडेशन स्थापन केले आहे. त्यातून कंपन्या सामाजिक दायित्व योजनेखाली वा समाजातील दानशूर व्यक्ती प्राणी दत्तक घेऊ शकतील.

त्यांना प्राणी इतरत्र नेता येणार नाहीत. सरकारी महामंडळेही त्यात आपले योगदान देऊ शकतील, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT