Goa12thResult Dainik Gomantak
गोवा

Goa12thResult: बारावीचा निकाल दोन दिवसांत जाहीर...

गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष निकालाची (Goa12thResult) तारीख जाहीर करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: बारावीचा निकाल (Goa12thResult) येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होणार आहे. गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (Goa Board Class 12 Results) अध्यक्ष नेमकी निकालाची तारीख जाहीर करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गुरुवारी दिली. एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता प्रतीक्षा आहे ती बारावीच्या निकालाची. कोरोना महामारीपासून विद्यार्थ्यांना जपण्यासाठी सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. (Goa Board:12th result announced in two days)

अंतर्गत मूल्यांकन व मूल्यमापनाच्या माध्यमातून हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 2 जून रोजी दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा झाल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी सीबीएससीच्या मूल्यमापन पध्दतीचा वापर करतानाच 30-30-40 असा फॉर्म्युला अंगिकारला आहे. दहावी व अकरावीच्या परीक्षेतील प्रत्येकी 30 गुण व बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील 40 गुण असे एकूण 100 गुण जमेस धरून बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. जे विद्यार्थी निकालावर समाधानी नसतील, त्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी आहे. मात्र, ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन असेल, हे त्यावेळच्या कोरोना स्थितीवर अवलंबून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT