Goa Secondary and Higher Secondary Revaluation Dainik Gomantak
गोवा

Goa Education: उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी आता 100 रु. शुल्क; फोटोकॉपी प्रत मिळणार; सुलभ प्रक्रियेसाठी शालान्त मंडळाचा निर्णय

Goa Paper Rechecking Fee: पत्रिका पाहून त्यांना ज्या प्रश्नांबाबत समस्या आहे, ते दोन दिवसांत कळवावे लागेल. जितक्या प्रश्नांबाबत समस्या असेल, तेवढ्या प्रश्नांचे प्रतिप्रश्न १०० रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल.

Sameer Panditrao

Goa Board Exam Paper Revaluation Fee

पणजी: यंदापासून दहावी आणि बारावीच्या शालान्त परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याला निकालानंतर आपल्या उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करायची असल्यास आता प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये शुल्क अदा करावे लागणार असल्याचे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.

शेट्ये म्हणाले की, पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की, आपल्याला कमी गुण मिळाले आहेत. त्यावेळी प्रतिपेपर ७०० रुपये शुल्क भरून पुन्हा पूर्ण उत्तरपत्रिका तपासली जायची.

..तर परतावा मिळणार

प्रत्येक प्रश्नपत्रिकेत सर्वसामान्यपणे १५ ते २० एका गुणाचे प्रश्न असतात. या एका गुणाचे उत्तर बरोबर असताना जर गुण दिले नसतील तर फेरतपासणीनंतर त्या विद्यार्थ्याला शुल्काचा परतावा मिळेल. फेरतपासणी प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

फोटो कॉपीसाठी पाचशे रुपये

गोवा शालान्त मंडळाच्या नव्या प्रक्रियेनुसार, जर एखाद्या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करायची असेल तर पहिल्यांदा आपल्या शाळेच्या पोर्टलच्या माध्यमातून ५०० रुपये भरावे लागतील. नंतर त्यांना शाळेच्या ईमेलवर उत्तरप्रतिकेची फोटोकॉपी प्रत पाठविण्यात येईल. ही पत्रिका पाहून त्यांना ज्या प्रश्नांबाबत समस्या आहे, ते दोन दिवसांत कळवावे लागेल. जितक्या प्रश्नांबाबत समस्या असेल, तेवढ्या प्रश्नांचे प्रतिप्रश्न १०० रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. जेणेकरून संबंधित प्रश्नांच्या उत्तराची फेरतपासणी होईल. ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT