वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा Dainik Gomantak
गोवा

Goa: भ्रष्टाचाऱ्याना भाजपचे समर्थन;कार्लुस आल्मेदा

दैनिक गोमन्तक

दाबोळी: कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरणातील व्यक्तीला पक्षात घेऊन एक प्रकारे भाजपने (BJP) घोटाळेबाज, भ्रष्टाचाऱ्याना समर्थन दिले आहे. सदर पक्षात प्रवेश केल्यावर राज्य महसूल विभागामार्फत चौकशी सुरू असताना दाजी साळकर यांना पक्षात घेणे म्हणजे, हा पक्ष कोमुनिदाद जमीन बळकावलेल्या भ्रष्टाचाराना सहकार्य करीत असल्याचा आरोप वास्कोचे भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला.

गोवा काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका मंत्रिमंडळातील मंत्र्यावर सेक्स स्कँडलचा आरोप केल्याने, देशात होणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका भाजपला जड जाण्याची शक्यता आमदार आल्मेदा यांनी पत्रकारांनी विचारले असता माहिती दिली.

पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजली असून, मंगळवार मुरगावचे माजी नगरसेवक दाजी साळकर यांने पणजी भाजप कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्य भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याविषयी वास्कोचे भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारले असता वरील माहिती त्यांनी दिली. खारीवाडा येथील कोमूनिदाद जमीन परस्पर विकल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दाजी साळकर यांना भाजपात प्रवेश देणे म्हणजे राज्य भाजपने एक प्रकारे जमीन घोटाळ्याबाजाना समर्थन दिल्या सारखे आहे.

साळकर यांच्यावर कोमूनिदाद जमीन घोटाळा प्रकरणी राज्य महसूल विभागामार्फत चौकशी सुरू असताना त्यांना पक्षात घेणे, एक प्रकारे भाजप भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासारखे असल्याचा आरोप आमदार आल्मेदा यांनी केला. वास्कोत मतदार संघ पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा जवळ होता. त्याला आम्ही दहा वर्षे सांभाळून नवीन संजीवनी दिलेली आहे.वास्कोत होत असलेलं कदंब बसस्थानकाचा विकास होत नसल्याचा आरोप फक्त दाजी त्याची पत्नी करीत होती. आता साळकर यांने मुख्यमंत्र्याच्या सहकार्याने वास्को कदंब बसस्थानक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आल्मेदा यांनी सांगितले.

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील भाजपाचा एक मंत्री सेक्स स्कँडल मध्ये असून त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी (CM) कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सेक्स व्हिडिओ कदाचित वास्को मतदार संघाच्या जवळ असलेल्या मंत्र्याचा असण्याची शक्यता आमदार कार्लोस आल्मेदा यांनी व्यक्त केली. त्याच सेक्स व्हिडीओ बद्दल मी प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना माहिती दिली असून जर त्या मंत्राचा व्हिडिओ जाहीर झाल्यास त्याचा फटका उत्तर प्रदेश, पंजाब, मणीपूर व गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता शेवटी आमदार आल्मेदा यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT