Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दोघांना एकत्र बोलावलं म्हणजे...! मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर तानावडे स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant Vs Health Minister Vishwajit Rane: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने चर्चेसाठी बोलावले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने चर्चेसाठी बोलावले होते. दोघांना सोबत केंद्रीय नेत्यांनी बोलावले म्हणजे त्यांच्यात मतभेद आहेत, असे होत नाही,असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. या बैठकीचे अनेकजण विविध तर्क लावत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यात मतभेद असल्याचे बोलले जात आहे, परंतु याबाबत स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मतभेद राहायला हे काही वैयक्तिक कार्य नाही तर पक्षीय काम आहे,असेही ते म्हणाले.

ते भाजपच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. दरम्यान तानावडे म्हणाले, आज संघटनमंत्री सतीश धोंड गोव्यात आले आहेत त्यांच्यावर महाराष्ट्रातील निवडणूकांची जबाबदारी आहे, त्यासाठी जे तिकडे रवाना होणार आहेत. त्यापूर्वी ते आज घरी आले आहेत ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु त्याचा देखील वेगळा अर्थ लावला जात असल्याचे तानावडे म्हणाले.

सौहार्द अबाधित; नवी प्रथा पाडू नये!

तानावडे यांना काणकोण येथील जुलूससंबंधी सुरू असलेल्या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, गोव्यात धार्मिक सौहार्द अबाधित आहे. येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे येथे एखादी नवी प्रथा सुरू करण्याचा कोणी प्रकार करू नये, या मताचा मी आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्या बदनामीसंबंधी व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले,त्याचेही त्यांनी समर्थन करून काहीजण नाहक राजकारण करत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT