Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP State President: आज ठरणार गोवा भाजपची धुरा कोणाकडे? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होणार घोषणा; उत्सुकता ताणली

BJP State President Announcement: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, या गेल्या काही दिवसांत उत्कंठा वाढवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शुक्रवार (ता.१७) सायंकाळी साडेसहा वाजता मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, या गेल्या काही दिवसांत उत्कंठा वाढवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शुक्रवार (ता.१७) सायंकाळी साडेसहा वाजता मिळणार आहे. भाजपच्या गाभा समितीची बैठक पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बोलावण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे.

भाजपच्या संघटन पर्वाचे राज्य निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित राहतील. शुक्रवारी (ता.१७) दुपारी त्यांचे राज्यात आगमन होईल. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. ते पणजीतील कार्यालयात नेत्यांशी चर्चा करतील. गाभा समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील. प्रदेश पातळीवरून प्रदेशाध्यक्षपदासाठी सुचवण्यात आलेल्या नावांपैकी कोणत्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली आहे याची माहिती ते या बैठकीत देतील.

त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला जाईल. शनिवारी सकाळी १० वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात होणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याच वेळी केंद्रीय परिषदेसाठी तीन जणांची निवड केली जाणार आहे. ते सारे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी मतदान करणार आहेत. देशातील पन्नास टक्के राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले गेले की राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी मतदान घेण्याची वेळ आली, तर राज्य कार्यकारिणीचे ५४ सदस्य, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व खासदार सदानंद शेट तानावडे असे ५९ जण मतदान करतील.

दामू नाईक यांची वर्णी शक्य

भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामू नाईक व माजी खासदार ॲड नरेंद्र सावईकर यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी दामू यांची निवड या पदावर होईल, असे सांगण्यात येत आहे. दामू यांना मात्र आज रात्रीपर्यंत त्याविषयी अधिकृतपणे कोणीही सांगितलेले नव्हते. ते उद्या (ता.१७) सकाळी भाजप कार्यालयात येणार आहेत. दामू हे दोन वेळा आमदारपदी निवडून आलेले असून वयाच्या सहाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जाणारे आहेत. याशिवाय ते भंडारी समाजाचे असल्याचा मुद्दाही भाजपने विचारात घेतल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT