MLA Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

'यापुढे असे होता कामा नये', All is not well वक्तव्याप्रकरणी प्रदेशाध्यक्षांकडून आमदार लोबोंना समज

Goa Politics: तानावडे यांनी पक्षाच्या चौकटीत विषय मांडण्याची आमदार लोबोंना समज दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा शेरा मारणारे आमदार मायकल लोबो यांना समजावण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी (दि.१४ ऑगस्ट) सायंकाळी उशिरा केला. त्यांच्यासोबत प्रदेश खजिनदार संजीव देसाई होते. मी लोबो यांना भेटणार, असे तानावडे यांनी आज दुपारीच जाहीरपणे सांगितले होते.

पर्रा येथे लोबो यांच्या निवासस्थानीच या तिघांची ही बैठक झाली. त्यावेळी काही वेळ आमदार दिलायला लोबो याही उपस्थित होत्या. त्या बैठकीत लोबो यांनी यापूर्वी एका मंत्र्याकडून आपल्या व्यवसायांना कसे लक्ष्य करण्यात आले होते, याचा पाढा वाचला.

सरकार काही मुद्यांवर ठाम भूमिका घेत नाही. गोमंतकीयांचे प्रश्न सरकारकडे नेऊनही ते सोडविले जात नाहीत. यामुळे मी वैतागलो आहे, असे त्यांनी या बैठकीत सांगण्याचा प्रयत्न केला. मोठे बहुमत असतानाही विधेयके मागे घेण्याची नामुष्की सरकारवर यावी, याला सर्व काही आलबेल नाही तर काय म्हणायचे, अशी विचारणाही त्यांनी केली.

तानावडे यांनी पक्षाच्या चौकटीत विषय मांडण्याची समज दिली. आमदाराने जनतेचे प्रश्न हाताळले पाहिजेत. असे करताना आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार आहोत, याचे भान जरूर ठेवले पाहिजे, असे तानावडे यांनी त्यांना सुनावले. सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना बळ मिळेल असे यापुढे होता कामा नये, असेही लोबो यांना यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT