bjp  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 200 किलो पेढे, 20,000 झेंडे! गोव्यात भाजप ‘पार्टी मूड’मध्ये; विजयोत्सवासाठी सज्ज

Goa BJP: राज्यातील युवा माेर्चाचे कार्यकर्ते पणजी आणि मडगाव येथील केंद्रांवर एकत्र येतील. त्यानंतर मिरवणुकीची तयारी केली जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP

‘लोकसभा निवडणुकीत यंदा आम्ही गोव्याच्या दोन्ही जागा जिंकणार’, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे निकालाच्या आदल्या दिवशी भाजपने जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे. हा पक्ष पार्टी मूडमध्ये असून त्यांनी फटाके, पेढे, तसेच जिलेबीची मोठी ऑर्डर दिली. गोव्यातील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून शेजारील राज्यांतील ढोल-ताशांचे पथकही बोलाविण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक यांनी सांगितले, की दोनशे किलो पेढे आणि शीतपेयाची ऑर्डर आजच दिली आहे. पणजीतच भाजप जल्लोष करेल. हा सारा खर्च केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक खर्चात धरत असल्याने त्याची काळजी घ्यावी लागणार असली तरी नेहमीप्रमाणे नेते-कार्यकर्त्यांसाठी पणजी कार्यालयात जेवणाची व्यवस्था असेल.

भाजपच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, आम्ही जिंकणार हे स्पष्ट आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. मंगळवारच्या तयारीसंदर्भात तसेच पुढील रणनीतीसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पणजी कार्यालयात झाली.

काँग्रेसच्या गोटात शुकशुकाट

भाजपने मोठ्या जोषात विजयोत्सवाची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मात्र जल्लोषाचे काहीच वातावरण दिसले नाही. यासंंदर्भात अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होउ शकला नाही. अनेक नेत्यांचे फोन बंद होते.

सत्तरीत जंगी तयारी

विश्वजीत राणे यांच्या सत्तरी येथील कार्यालयात विजयाचे बॅनर रात्रीच तयार करण्यात आले असून आतषबाजीसाठीही कार्यकर्ते सज्ज आहेत.

जेवणाचीही सोय

निकालावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते पणजी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या नेत्याने सांगितले.

बेळगावात डिझाईन

जनतेला अभिवादन देणारे भव्य पोस्टर्स तत्काळ सर्व ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यातील बहुतांश पोस्टर्सचे डिझाईन बेळगावात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT