Girish Chodankar And Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Girish Chodankar Criticized BJP Government: निधीअभावी मिळालेल्या खात्यांविषयी मंत्री रमेश तवडकर यांनी असमाधान व्यक्त केल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत चोडणकरांनी हा निशाणा साधाला.

Manish Jadhav

पणजी: भाजपचे मंत्री जनतेसाठी काम करण्याऐवजी फक्त आर्थिक दृष्ट्या 'स्वयंपूर्ण' आणि 'श्रीमंत' खात्यांचा हव्यास धरत आहेत, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी केला. निधीअभावी मिळालेल्या खात्यांविषयी मंत्री रमेश तवडकर यांनी असमाधान व्यक्त केल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत चोडणकरांनी हा निशाणा साधाला. एवढेच नाहीतर भाजपचे “मिशन टोटल कमिशन” आता उघड होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

या संदर्भात बोलताना चोडणकर म्हणाले की, “तवडकर यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत दिलेल्या खात्यांत 'दम' नाही असे म्हटले, पण प्रत्यक्षात त्यांचा अर्थ 'दाम' (पैसा) नाही असा होता. भाजपने सत्तेत येण्याआधी लोकसेवेची भाषा केली होती, पण आता त्यांच्या मंत्र्यांना खाती लोकसेवेसाठी हवी आहेत की पैसा कमावण्यासाठी, हे जनतेला कळायला हवे."

सेवा की कमिशन?

चोडणकर यांनी मंत्री तवडकर यांच्या सध्याच्या खात्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले. चोडणकर म्हणाले, “क्रीडा, कला-संस्कृती आणि आदिवासी कल्याण यांसारख्या खात्यांद्वारे तवडकर युवकांना आणि समाजातील गरजू घटकांना मदत करु शकतात. पण त्यांना फक्त पैसे मिळणारी खातीच हवी आहेत.”

यावर अधिक जोर देत चोडणकर यांनी एक महत्त्वपूर्ण सल्लाही दिला. "मंत्र्यांनी आपल्या खात्यांना ‘कमिशनपूर्ण’ बनवण्याऐवजी ‘रेव्हेन्यू स्वयंपूर्ण’ करण्याचा मार्ग शोधायला हवा," असा टोलाही त्यांनी लगावला. हे वक्तव्य भाजपच्या कथित भ्रष्टाचाराच्या धोरणांवर थेट हल्ला मानले जात आहे.

राजीनाम्याची धमकी आणि कोकणी म्हणीचा वापर

चोडणकर यांनी दावा केला की, मंत्री तवडकर यांनी मजबूत खाते न मिळाल्यास आपल्या पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारताना एका कोकणी म्हणीचा आधार घेतला - “राजाने भिकाऱ्याचा तुकडाही हिसकावून घेतला.” या म्हणीचा अर्थ असा की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे सर्व महत्त्वाचे व 'दम' असलेले विभाग ठेवले आणि इतर मंत्र्यांसाठी काहीच शिल्लक ठेवले नाही.

कला अकादमीचे उदाहरण आणि 'दिवाळखोरी'चा आरोप

चोडणकर यांनी तवडकर यांच्या 'खात्यांमध्ये दम नाही' या विधानाला भाजप सरकारच्याच धोरणांशी जोडले. “कला अकादमीचे नूतनीकरण करताना भाजप सरकारने कशी मोठ्या प्रमाणावर लूट केली हे राज्यातील जनतेला माहीत आहे. मी तवडकर यांच्याशी सहमत आहे की, हे विभाग खरोखरच दिवाळखोरीत गेले आहेत, पण त्याचे मूळ कारण भाजप सरकारची लूट आहे. भाजपनेच सरकारी संस्थांना आणि विभागांना कमकुवत केले आहे, आणि आता त्यांचेच मंत्री 'दम' नसलेल्या खात्यांबद्दल तक्रार करत आहेत," असे चोडणकर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे गोव्याच्या राजकारणात आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

SCROLL FOR NEXT