Swapnesh Sherlekar audio leak Dainik Gomantak
गोवा

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

BJP leader threat call Goa: सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकरांनी याप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकरांना भाजप नेत्याने फोनवरुन धमकी दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रामा काणकोणकर यांना झालेल्या जीवघेण्या मारहाणीच्या घटनेनंतर शेर्लेकरांना मिळालेल्या धमकीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आम्ही देशप्रेमी म्हणत भाजप नेता महानंद अस्नोडकर शेर्लेकरांनी धमकी देत आहे. या फोनचा ऑडिओ आता समोर आला आहे.

“आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोहीसारखे काम करु नको. पक्षाचे कार्यकर्ते आणि देशप्रेमींवर बोलशील तर विषय भरकटेल. सगळ्यांना एकाच माळेत गोवत असाल तर तू चुकीचे करतोयेस. व्हिडिओत तू काय बोलला ते तपासून पाहा. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलू नको, आम्ही देश प्रेम करणारे लोक आम्हाला पक्ष लागत नाही”, असे महानंद अस्नोडकर फोन कॉलवर बोलत आहे.

“तुला बोलायचं तर, मंत्र्यांवर बोल, मुख्यमंत्र्यांवर बोल त्याच्याशी काय नाही. मी रोहन खंवटे किंवा मुख्यमंत्र्याचे समर्थन करतो असे काहीच नाही. तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या समोर ये नाहीतर, मला बोलव मी येतो तिथे”, असे आव्हान देत आहे.

Listen Audio Here

(गोमंतक या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)

तू मूर्ख आहेस, देवाने तुला कमी अक्कल दिली, असेही महानंद अस्नोडकर या फोन कॉलवर बोलताना दिसत आहे. यावेळी महानंद खाप्रेश्वर देवस्थानाबाबत देखील बोलत आहे.

शेर्लेकर यावेळी महानंदला पक्षाच्या बैठकीत बोलण्यासाठी सांगत आहेत, तसेच, सरकार देखील तुमचेच असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पत्रकार परिषद घे, असे महानंद सांगत आहे.

काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरण ताजे असताना समोर आलेला धमकीचे प्रकरण चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी दिली आहे. विजय सरदेसाई, अमित पाटकर आणि युरी आलेमाव यांनी या धमकीचा निषेध केला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकरांनी याप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT