Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar: दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; भाजप नेत्याचा बाबू आजगावकरांना इशारा

दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधलेल्या घरांना घर क्रमांक देण्याचे प्रकरण

गोमन्तक डिजिटल टीम

दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधलेल्या 165 बेकायदेशीर घरांना पंचायतीने घर नंबर द्यावेत यासाठी माजी आमदार बाबू आजगावकर सरपंच हर्क्यूलान नियासो यांच्यावर दबाव आणत असून त्यांना ते धमकी देत असल्याचा आरोप भाजप पक्षातीलच एसटी नेते अँथनी बार्बोजा यांनी केला असून आजगावकर यांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधलेली ही घरे पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांच्याकडे घराच्या मालकीची कुठलीही कागदपत्रे नाहीत. अशा घरांना कायदेशीर करावे अशी मागणी आजगावकर कसे करू शकतात असा प्रश्र्न बार्बोजा यांनी केला. ही बेकायदेशीररित्या बांधलेली घरे बिगर गोमंतकीयांची असून त्यांच्यासाठी आजगावकर मूळ गावकर असलेल्या सरपंचावर दबाव का आणतात असा सवाल त्यांनी केला आहे.

दवर्ली येथील एका वाड्यावर ही घरे असून दुसऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून ती बांधली गेली आहेत. या घरांना पंचायतीने घर क्रमांक द्यावेत असे आर्ज १६५ जणांनी केले होते. मात्र त्यांच्याकडे घर मालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्याने हे अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर आजगावकर यांनी सरपंच नियासो यांच्यावर या घरांना क्रमांक देण्यासाठी दबाव आणला होता. त्यामूळे काल मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान ही घरे पाडून टाकण्यासाठी नगर नियोजन खात्याने आदेश दिला असून त्या घर मालकांच्या विरोधात नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. नियासो हे एसटी समाजाचे असून त्यांच्यावर कुणी दबाव आणल्यास अन्य एसटी बांधव गप्प राहणार नाहीत असा इशारा बार्बोजा यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT