Digambar Kamat : विरोधी पक्षनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत व त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवत आहेत. त्यांना जर खरचं भाजपात यायचे असेल तर त्यांनी काँग्रेस व आमदारकीचा राजीनामा द्यावा. नंतरच प्रवेशाची भाषा करावी, अशा शब्दांत भाजप मडगाव मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी टीका केली. तसेच कामत यांच्या गटातील चार नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट महात्मे यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मडगाव नगरपालिकेतील भाजपचे सात नगरसेवक आहेत. मध्यंतरी फातोर्डेची नगरसेविका श्वेता लोटलीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी अपक्ष नगरसेवक महेश आमोणकरने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मडगाव पालिकेत भाजपचे संख्याबळ 9 झाले आहे. पत्रकार परिषदेला माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस रंजिता पै, प्रवक्ता शर्मद पै रायतुरकर व मडगाव मंडळाचे माजी अध्यक्ष चंदन नायक उपस्थित होते.
दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशाशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या कथित प्रवेशाबद्दलच्या आमच्या भावना आम्ही पक्षश्रेष्ठीना कळविल्या आहेत. योग्य वेळी आम्ही आमची भुमिका स्पष्ट करू. प्रवेशानंतर सर्वांना कोण समजेल की ते चार नगरसेवक कोण आहेत.असंही रुपेश महात्मे यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.