Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'तो पैसा भाजपचा नाही करदात्यांचा आहे, निधी लुटणे ही अंतर्गत बाब नाही;' गावडेंची हकालपट्टी करा

Goa Congress: "सदानंद तानावडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो- पणजीकर

Ganeshprasad Gogate

Goa Congress: ‘कला आणि संस्कृती खात्यातील निधीचा गैरवापर’ हा पक्षांतर्गत मुद्दा असल्याचे बोलल्या बद्दल भाजपचे अध्यक्ष आणि खासदार सदानंद तानावडे यांच्यावर निशाणा साधत, हा निधी त्यांच्या पक्षाचा आहे का, असा सवाल काँग्रेसने शनिवारी केला.

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'विशेष अनुदाना'चा गैरवापर केल्याचा आरोप गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी केल्यानंतर काँग्रेसने गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

"सदानंद तानावडे यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. कला आणि संस्कृती खात्याने लुटलेला हा पैसा भाजपचा नसून करदात्यांचा आहे, हे त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे हा भाजपचा अंतर्गत विषय ठरत नाही.

हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, त्यात तवडकर यांनी गावडे यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे,” असे मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.

“आम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की सरकार ‘कला अकादमी’ नूतनीकरण घोटाळ्याची फाईल ‘अंतर्गत बाब’ या सूत्राचा वापर करून बंद करेल का.

अशा प्रकारे भाजप आपल्या मंत्र्याला आणखी भ्रष्टाचार करून राज्याच्या तिजोरीची लूट करण्याचा मार्ग मोकळा करत आहे,” असे पणजीकर म्हणाले.

"मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवणार असल्याचे तानावडे सांगत आहेत. मला हे जाणून घ्यायचे आहे की डबल इंजिन सरकार भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकण्यात माहिर आहे का?

याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करून भाजपाचा भ्रष्टाचार उघड करु, असे पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT