Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सुनीता सावंत यांच्या बदलीवरुन आता राजकारण; सरकार बजरंग दल नेत्यांना संरक्षण देत असल्याचा काँग्रेसचा आरोप

South Goa SP: सरकार पोलिस दलाचा वापर कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हितसंबंधांसाठी करत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची घाईघाईने केलेली बदली हे भाजप आपला विभाजनकारी अजेंडा सुरक्षित करण्यासाठी प्रशासनात कसा हस्तक्षेप करत आहे याचे आणखी एक स्पष्ट उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

फक्त बजरंग दल नेत्यांना संरक्षण देण्यासाठीच हा सर्व उपद्व्याप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधीक्षक सुनीता सावंत यांनी गोव्यातील बजरंग दल नेत्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा सरकारने घाबरून त्यांची तत्काळ बदली केली. यावरून स्पष्ट होते की भाजपला प्रशासनात रस नाही तर त्यांच्या वैचारिक सहयोगींना संरक्षण देण्यात आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात रस आहे, अशी टीका त्यांनी केली.

Amit Patkar Post

हे सरकार पोलिस दलाचा वापर कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हितसंबंधांसाठी करत आहे. सावंत यांची ही बदली म्हणजे प्रामाणिकपणे काम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यासारखे आहे, असे पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT