Mopa Airport | Ramakant Khalap  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: बाकीबाब यांच्या कल्पनेतील गोवा कुठे आहे? रमाकांत खलपांची सरकारवर बोचरी टीका!

Mopa Airport: गोव्याची ओळख नाहीशी करण्यासाठी काहीजण धडपडत आहे, अशी रमाकांत खलप यांनी सरकारवर टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: गोव्यात वेश्या व्यवसाय, गुंडगिरी करण्यासाठी परराज्यातील लोक येतात. हे प्रकार गल्लोगल्ली सुरू आहेत. गोव्याची ओळख नाहीशी करण्यासाठी काहीजण धडपडत आहेत. बाकीबाब यांच्या कल्पनेतील गोवा कुठे आहे, असा प्रश्‍न माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी उपस्थित केला.

म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर घेतलेल्या जाहीर सभेत मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कर्नाटकमध्ये आपण जमीन घेण्यासाठी गेल्यास तेथे शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागतो; पण गोव्यात कुणीही येऊन कितीही जमीन खरेदी करू शकतो. परराज्यांतील लोकांना आपल्या जमिनी विकू नका, असे आवाहन खलप यांनी यावेळी केले.

यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, आज राज्य अधोगतीकडे चालले आहे. वेश्या व्यवसायासारखे किळसवाणे प्रकार उघडपणे चालले आहेत. 2012 पासून गोव्याची प्रतिमा धुळीस मिळविली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ व ‘आप’मुळे मतांची विभागणी झाली. नाही तर भाजपचे सात उमेदवारही निवडून आले नसते.

कॅसिनोच्या माध्यमातून राज्यात वेश्या व्यवसाय, जुगार आणण्याचे कारस्थान केले जात आहे, अशी टीका वेलिंगकर यांनी केली. यावेळी अविनाश भोसले, पेडण्याचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू, प्रा. गजानन मांद्रेकर, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे, काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, रामराव वाघ, मगोप कार्यकर्ते एकनाथ नागवेकर, अमृत आगरवाडेकर, सुदेश तिवरेकर, शंकर फडते, राजेंद्र कोरगावकर, सुनील पिळगावकर, कृष्णा गावकर, विजय विर्नोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

भाजपने लोकांना लाचार बनवले

यावेळी सुभाष वेलिंगकर यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने आमदारांना लाच देऊन विकत घेतले. सध्या भाऊसाहेबांना कमी लेखण्याचे काम सुरू आहे. पण भाऊ लोकांच्या हृदयात, मनात आहेत. भाजपने लोकांना लाचार केले. ‘मोपा’ला भाऊसाहेबांचे नाव न दिल्यास सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही वेलिंगकर यांनी यावेळी दिला.

यु-टर्न मास्टरचे नाव ‘मोपा’ला नको!

सुभाष केरकर म्हणाले की, मोपाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे, यासाठी आम्ही सर्व अधिकारी, मंत्री यांना निवेदने दिली आहेत. आता राज्यपालांना निवेदन देणार आहोत. काही वृत्तपत्रांनी ‘मोपा’ला मनोहर पर्रीकर यांचे नाव देणार, असे म्हटले आहे.

परंतु या बातम्या खोट्या आहेत. मोपा विमानतळाला यु-टर्न मास्टरचे नाव देऊ नका, अशी खुद्द भाजपवाल्यांचीच मागणी असल्याचे शंकर फडते यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

भिजत पडलेलं युतीचं घोंगडं कधी सुकणार? जनतेला हवाय 'सक्षम पर्याय'; विरोधकांनो स्ट्रॅटजी बदला!

IND vs WI: "वर्ल्ड कपमध्ये असल्या तमाशांची काय गरज?" ईडन गार्डन्सवरील हाय-व्होल्टेज सामन्यातील 'लेझर शो'वर भडकले शास्त्री-गावस्कर

इराक, व्हेनेझुएला आणि आता इराण... अमेरिकेच्या 'हिटलिस्ट'वरचा पुढचा नंबर कोणाचा?- संपादकीय

सां जुझे आरियल ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप; सप्टेंबरनंतर एकही ग्रामसभा घेतली नसल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले

SCROLL FOR NEXT