Goa Government | Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंडखोर आमदारांना मंत्रिपदं मिळणार, कुणाला कोणते खाते?

Goa BJP: गोव्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कॉंग्रेसमधील फुटिरांना पदे देण्याच्या सूचना पक्षपातळीवरुन आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: गोव्यात पक्षांतर झाले, त्याचदरम्यान पंजाबमधील कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये गेले होते. त्यांना काल रितसर पक्षात मोठ्या पदांवर सामावून घेण्यात आले. त्यामुळे गोव्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कॉंग्रेसमधील फुटिरांना पदे देण्याच्या सूचना पक्षपातळीवरून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्यापूर्वी या फुटिरांना मंत्रिपद आणि महामंडळांचे वाटप होईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडलेले कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड या दिग्गज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेण्याचा मोठा निर्णय भाजपने घेतला होता. त्याची काल पूर्तता करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गोव्यातही काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या 8 जणांपैकी काहींची महामंडळांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच त्यापैकी एकाला केंद्रीय कार्यकारिणीत संधी मिळू शकते.

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड हे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. गोव्यात भाजपमध्ये सामील झाल्यानंतर या आठही आमदारांना आपल्याला मोठ्या पदावर संधी मिळणार, अशी आशा होती. मात्र, कित्येक दिवस त्यांना वाट पाहावी लागली. अखेर या आठ जणांपैकी काहींना महामंडळे देण्यात येणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली.

यांनी दिली होती काँग्रेसला सोडचिठ्ठी

राज्यात कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी घाऊकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला होता. यात दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता.

या पक्षांतरामुळे काँग्रेसकडे आता युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस आल्वारिस फेरेरा हे तीनच आमदार उरले आहेत. या फुटिरांपैकी काहींची महामंडळांवर वर्णी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT