Goa Congress Dainik Gomantak
गोवा

राज्य सरकारची भूमिका गोमंतकीयांच्या विरोधात; काँग्रेसकडून 'हाथ बदलेगा हालात' मोहीम सुरु

गोमंतकीयांना सरकार विरोधी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे, असे घाटे म्हणाले. विषय सोडविण्यासाठी सेवादल प्रयत्न करणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकारच्या गोमंतकीयांबाबत भूमिका पाहिल्यास त्या विरोधी असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान या सर्व समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या सेवादल संघटनेतर्फे हाथ बदलेगा हालात मोहीम सुरु करण्यात आली आहे, असे प्रदेश सेवादलाचे कार्यवाह तथा मुख्य संघटक राजन घाटे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मुख्य संघटक जयदेव गावकर उपस्थित होते. घाटे पुढे म्हणाले की, गोमंतकीयांना सरकार विरोधी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. म्हादई, पाणी समस्या, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणार ट्रॅक्स, वीज दरवाढ, झुवारी जमीन घोटाळा, सनबर्न, डोंगर कापणी असे अनेक विषय आहेत. हे विषय सोडविण्यासाठी सेवादल प्रयत्न करणार आहे.

राज्यात गोमंतकीय असल्यास जमीन मिळत नाही, परंतु बिगर गोमंतकीयांना मात्र जमीन सहज उपलब्ध होते. आम्हाला हे हालात बदलण्यासाठी एकत्र येणे अनिवार्य बनले आहे. ही मोहीम सुरु झाल्यावर आम्ही विविध उपक्रम सेवादलातर्फे घेणार आहोत. गोवा राज्य टिकविण्याचे काम आता आम्हा सर्वांना करायचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवे, असे घाटे म्हणाले.

मिस कॉल द्या

सेवादलात काम करण्यासाठी आणि जनतेचा आवाज बनण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी ९११२९०००८९ क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन राजन घाटे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT