Ashish Sood Goa Visit 
गोवा

Ashish Sood: भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद गोवा दौऱ्यावर! भोमावासियांनी घेतली भेट

खासदार सदानंद शेट तानावडे आणि वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

Ashish Sood Goa Visit: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद आज सोमवारी (29 जानेवारी) गोव्यात दाखल झाले आहेत. खासदार सदानंद शेट तानावडे आणि वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गोव्यात आले आहेत. यावेळी भोमा गावच्या स्थानिकांनी आशिष सूद यांची भेट घेतली. सध्या भोमा महामार्ग विस्ताराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.

महामार्ग विस्ताराबाबत पुनर्विचार करण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना निवेदन सादर केले. त्यावर सूद यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी आपण लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी भोमावासियांना सांगितले आहे. मात्र अद्याप त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, अशी माहिती बैठकीनंतर ग्रामस्थांनी दिली.

त्यानंतर आशिष सूद यांनी भाजप मंत्री आणि आमदारांची पहिली बैठक बोलावली. तसेच 6 फेब्रुवारीला मडगावात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेच्या आणि रॅलीच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.

मोदींच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT