Goa Updates 29 January 2024: गोव्यातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Breaking News 29 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 29 January 2024
Goa Live Updates 29 January 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

लीडर्स @ जीसीसीआय मध्ये यावेळी एम.जे.अकबर!

गोवा चेबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जीसीसीआय आयोजीत लीडर्स @जीसीसीआय या कार्यक्रमात उद्योजक श्रीनिवास धेंपे हे माजी केंद्रीय राज्य मंत्री, लेखक, पत्रकार एम.जे.अकबर यांच्यासोबत 'जगात भारताची बदलती गतिशीलता ' या विषयावर साधणार संवाद. बुधवारी संध्याकाळी साडे चार वाजता पणजी जीसीसीआयच्या सुरेंद्रबाबू तिंबलो सभागृहात आयोजन.

गोव्याला नवे आयएएस आणि आयपीएस अधिकारी!

ई.वल्लावन आणि अंकित यादव हे दोन आयएएस आणि रोहीत राजबीर सिंग आणि राहुल गुप्ता या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची गोव्यात नियुक्ती.

खेलो इंडिया वुशूमध्ये स्पर्धेत तिसऱ्या दिवसाअखेर गोव्याची 6 पदकांची कमाई

भारतीय वुशू असोसिएशन, गोवा वुशू असोसिएशन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला वुशू लीगमध्ये आज तिसऱ्या दिवसापर्यंत गोव्याने 1 रौप्य आणि 5 कांस्य पदके जिंकली.

शहीद दिनानिमित्त 30 जानेवारीला 2 मिनिटे मौन' बाळगा

केंद्राच्या निर्देशानुसार, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता देशभरात 2 मिनिटे मौन पाळण्यात येईल. गोवा सरकारनेही सूचना केली जारी

आता गुंतवणूकदारांनी मोठा विचार करण्याची वेळ- CM

गोवा औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने इन्व्हेस्ट गोवा 2024 परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी या परिषदेचे थाटात उदघाटन झाले.

याउदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुंतवणूकदारांनी आवर्जून गोव्यात यावे आम्ही त्याचे स्वागत करतो अशा भावना व्यक्त केल्या. ''गोव्यात येण्याची, गोव्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे, गोव्याकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून पाहू नका तर एक आर्थिक पॉवर हाऊस म्हणून पहा.

गोवा या दृष्टीने परिपूर्ण आहे. कारण आम्ही आम्ही स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर विश्वास ठेवतो'', व्यासपीठावरून बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद गोव्यात दाखल

भाजप नेते आणि गोवा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांचे सोमवारी गोव्यात आगमन झाल्यावर खासदार सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर हे उपस्थित होते

'तो' पोलीस कॉन्स्टेबल निलंबित; एकाला अटक!

माशेल येथील फास्टफूड मालक विराज माशेलकरला मारहाण करणाऱ्या फोंडा पोलीस स्टेशनचा हेड कॉन्स्टेबल समीर फडतेचे निलंबन. सद्या फडते फरार. एएनसी कॉन्स्टेबल आकाश नावेलकरला अटक. मितेश गाड, मोहित गाड, सुप्रेश या अन्य तिघांचाही शोध सुरू.

दोनापावला येथील आयटी हॅबिटॅटचे होणार पुनरुज्जीवन!

गोव्यात नवीन आयटी उद्योगाच्या उभारणीसाठी दोनापावला येथील सध्याचा 'आयटी हॅबिटॅट'चे पुनरुज्जीवन करणार असून आता भूतकाळाच्या गोष्टी करायला नकोत. सर्व आयटी कंपनी याठिकाणी येतील, अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. येथील आयटी हॅबिटॅटचे कचराकुंडीत रूपांतर झाल्याचा रिपोर्ट 'गोमन्तक टीव्ही'ने केला होता.

'परीक्षा पे चर्चा' साठी मोठा प्रतिसाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमांतर्गत संवाद साधला. देशभरात याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. म्हापसा येथील जी. एस. आमोणकर शाळेत विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम पहिला.

अखेर दादागिरी करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल विरोधात एफआयआर!

माशेल येथील किरकोळ कारणावरून फास्टफूड मालकाला बेदम मारहाण करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल समीर फडते विरोधात म्हार्दोळ पोलिस स्थानकात एफआयआर दाखल. सीसीटीव्हीत कैद झालेल्या अन्य सहकाऱ्यांवरही पोलिसांकडून गुन्हा नोंद.

गोव्यात या, गुंतवणूक करा: मुख्यमंत्री सावंत

'मेक इन इंडिया' सारखीच 'मेक इन गोवा' संकल्पना रूजवूयात. गोव्यात या, गुंतवणूक करा. तुमच्या उज्जवल भविष्य व उत्तम उत्पादनासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. उद्योग विस्तारात गोवा आता फार दूर नाही. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'इन्व्हेस्ट गोवा 2024' च्या उदघाटनप्रसंगी सांगितले. यावेळी गोवा आयडीसी व आयपीबी यांचे अनावरण करण्यात आले.

हेडकॉन्स्टेबलची दादागिरी! माशेलमधील फास्टफूड मालकाला मारहाण

किरकोळ कारणावरून माशेल येथील फास्टफूड मालक विराज माशेलकर याला पोलीस हेडकॉन्स्टेबल समीर फडतेंनी केली मारहाण. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. याप्रकरणी फडते आणि यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांविरोधात म्हार्दोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान गोवा दौरा; अधिकाऱ्यांंनी केली बसस्थानकाची पाहणी! 

मडगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत कदंब बसस्थानकाची पाहणी केली. तसेच ते बेतुलमधील भारतीय ऊर्जा सप्ताह उद्‍घाटन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणीही करणार आहेत.

काँग्रेसने मानले भाजप मुख्यमंत्र्यांचे आभार!

काँग्रेस सरकारच्या योगदानाची कबुली दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गोवा मुक्ती चळवळीत भाग घेतला. ओपिनियन पोल आणि कोंकणीला मान्यता हे गोव्यासाठी काँग्रेसचे योगदान आहे. श्री प्रतापसिंह राणे हे गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असे म्हणत गोवा काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही मुद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट आभार मानले.

शिरसई पोटनिवडणूक: वॉर्ड क्र. 5 मधून तेजा कांदोळकर

बार्देश तालुक्यातील शिरसई ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 5 मधून तेजा राजेश कांदोळकर या विजयी ठरल्या.

Sircaim By Poll
Sircaim By PollDainik Gomantak

धक्कादायक! गांधी मार्केटमध्ये सापडलेल्या 3 वर्षांच्या मुलीला 'त्या' अज्ञात जोडप्यानेच तिथे सोडले?

शनिवारी (27 जानेवारी) मडगावातील गांधी मार्केटमध्ये तीन वर्षांची बेवारस मुलगी पोलिसांना सापडली. त्यानंतर तिच्या अज्ञात पालकांचा शोध घेणे सुरू होते. त्याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

जी तीन वर्षांची मुलगी सापडली होती, तिला एका अज्ञात जोडप्यानेच तिथेच आणून सोडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला 'अशा' आहेत गोव्यातील इंधनाच्या किमती; वाचा आजचे दर

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.38

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.94

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com